Tarun Bharat   Like Minded

Updated at: 22/05/2013 12:37:38
     
तुमचे शहर निवडा

मी सुगरण

तारीख: 6/29/2012 11:45:22 PM

 

$img_titleभोपळ्याची बाकरभाजी

 

साहित्य : तीन वाट्या लाल भोपळ्याच्या मध्यम आकाराच्या फोडी, एक वाटी तेल, हिंग, मीठ चवीनुसार, पाव वाटी चिंचेचा कोळ, पाव वाटी किसलेला गूळ, हळद. लाल तिखट, गरम मसाला, भाजलेलं सुकं खोबरं अर्धी वाटी, अर्धी वाटी भाजलेली खसखस, आलं-लसूण-हिरवी मिरची वाटण पाव वाटी, कढीलिंब, कोथिंबीर, पाव चमचा मेथीदाणे.

 

कृती : कढईत तेल गरम करून त्यात हिंग, कढीलिंब आणि मेथीदाणे घालावे. नंतर आलं-लसूण-मिरची पेस्ट घालावी. त्यात खोबरं व वाटलेली खसखस घालून परतावे. यावर भोपळ्याच्या फोडी, मसाला, हळद, तिखट, मीठ, चिंचेचा कोळ आणि गूळ घालून ढवळावे. थोडे पाणी घालून एक उकळी घ्यावी. कोथिंबीर घालून सजवावी व सर्व्ह करावी.