Tarun Bharat   Like Minded

Updated at: 22/05/2013 08:16:26
     
तुमचे शहर निवडा

किंगफिशर पुन्हा जमिनीवर

तारीख: 7/10/2012 8:14:48 PM

 

वैमानिक संपावर, पाच उड्डाणे रद्द

 

वृत्तसंस्था

 

नवी दिल्ली, १० जुलै

 

गेल्या पाच महिन्यांपासून थकित असलेल्या वेतन आणि अन्य भत्त्यांच्या मागणीसाठी किंगफिशर या खाजगी एअरलाईन्सच्या काही वैमानिकांनी पुन्हा संप पुकारला असून, यामुळे मद्यसम्राट विजय माल्याची ही विमानसेवा पुन्हा एकदा जमिनीवर आली आहे. या संपामुळे आज सकाळपासून पाच विमानांचे उड्डाण रद्द करण्यात आले.

 

दिल्लीत धर्मशाळा आणि देहराडून या दोन शहरांमधील उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. तथापि, एअरबस-३२० या विमानाच्या उड्डाणावर कुठलाही परिणाम झाला नाही. मुंबईहूनही या विमानसेवेची तीन उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.

 

वेतन आणि अन्य भत्त्याच्या मागणीसाठी गेल्या आठ दिवसांत वैमानिकांनी संप पुकारण्याची ही दुसरी वेळ आहे. दरम्यान, संपकर्त्या वैमानिकांच्या मागण्या जाणून घेण्यासाठी आणि त्यावर तोडगा काढण्यासाठी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय अग्रवाल लवकरच वैमानिकांची भेट घेणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.