Tarun Bharat   Like Minded

Updated at: 22/05/2013 08:16:26
     
तुमचे शहर निवडा

नांदा सौख्यभरे

तारीख: 7/10/2012 6:52:56 PM

 

 श्री स्वामी समर्थांची कृपा, श्रीसंत सखू माऊलीचा आशीर्वाद व त्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत दि.८ फेब्रुवारीला सिव्हील लाईन्स येथील लेडीज क्लब लॉनमध्ये ‘सौरभ-मुग्धा’च्या लग्नाचा स्वागत समारंभ मोठ्या दिमाखात पार पडला. या कार्यक्रमात शहरातील नामवंत, आप्तेष्ट व मित्रमंडळींनी हजेरी लावली.

 अखिल भारतीय स्टेट बँक एम्प्लॉईज (चार्ल्स कुट्टो) असोसिएशन्स्‌चे अध्यक्ष डॉ. प्रदीप येळणे यांचे सुपुत्र सौरभ व बुलडाण्याचे नामवंत व प्रख्यात नामवंत वकील,श्री रामकृष्ण आश्रम गांधी भवन ट्रस्टचे अध्यक्ष ऍड.उदय ढगे यांची सुकन्या मुग्धा यांच्या स्वागत समारंभसाठी आज लेडीज क्लब लॉन सुशोभित झाले होते. प्रवेशद्वारावर पाहुण्यांचे स्वागत करण्यासाळी येळणे परिवार सज्ज झाला होता.पाहुण्यांच्या मनोरंजनासाठी खास शहनाईवादन व राजेश बुरबुरे यांच्या ‘म्युझिक टू सोल’ या चमूने चौदवी का चॉंद हो, चांदसी मेहबुबा हो मेरी, माना हो तुम, हमे तुमसे प्यार कितन..अशी अनेक बहारदार गिते सादर करून पाहुण्यांना मंत्रमुग्ध केले.

येणार्‍या प्रत्येक पाहुण्यांचे स्वागत डॉ.प्रदीप येळणे व त्यांच्या सुविद्य पत्नी विजया मोठ्या आदराने करत होत्या.या आनंदमय सोहळ्यामुळे कुटुंबातील प्रत्येक जण सुखावले होते.पंचपक्कवान्न व मिष्ठान्नाने मेजवानीला फार रंगत आली होती.अंजिरो गजरेला, रसमलाई, गुजराथी कढी, रगडा पेटीस, पाणीपुरीचा आस्वाद येणार्‍या पाहुण्यांनी घेतला.

 या सोहळ्यामध्ये प्रामुख्याने अखिल भारतीय स्टेट बँक फेडरेशनचे सचिव प्रकाश गांगल,अखिल भारतीय स्टेट बँक स्टाफ फेडरेशनचे उपाध्यक्ष हरी प्रभू

 संकल्पना : राजेश सोनटक्के-९८८१७१७८४५