सोने, चांदीत घसरण
| तारीख: 7/10/2012 9:16:27 PM |
वृत्तसंस्था
मुंबई, १० जुलै
गुंतवणूकदार आणि व्यापार्यांनी नफा कमविण्यावरच भर दिल्याने सोन्याच्या, तसेच उद्योगांनी उचल कमी केल्याने मुंबई सराफा बाजारात आज चांदीच्या किमतीत घसरण झाली.
स्टॅण्डर्ड सोन्याचा प्रति तोळा भाव ६५ रुपयांनी खाली आल्याने,तो सोमवारच्या २९,५४० रुपयांवरून आज २९,४७५ रुपयांवर बंद झाला. शुद्ध सोन्याच्या किमतीतही ७० रुपयांची घसरण झाली.सोमवारी हा भाव २९,६७० रुपये होता. आज तो २९,६०० रुपये इतका झाला.
चांदीच्या प्रति किलो किमतीतही ७० रुपयांची घसरण झाल्याने, हा भाव सोमवारच्या ५३,२८० रुपयांवरून आज ५३,२१० रुपयांपर्यंत खाली आला.
दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याची किंमत ३० हजारांच्या खाली आली. १३० रुपयांच्या घसरणीसह येथे सोन्याचा भाव २९,९०० रुपयांवर आणि २०० रुपयांच्या घसरणीसह चांदी ५३ हजारावर स्थिरावली.