Tarun Bharat   Like Minded

Updated at: 26/05/2013 12:43:30
     
तुमचे शहर निवडा

दिनविशेष

तारीख: 8/1/2012 11:47:55 PM

 

माझ्या प्रिय भगिनींनो...

 


$img_titleरक्षाबंधन हा सण फक्त हिंदू धर्मीय साजरा करतात. बहिणीला सुरक्षिततेची व भावाला जबाबदारीची जाणीव दरवर्षी या रक्षाबंधनामुळे होत असते. अन्य धर्मीयांमध्ये दुधाचे नाते सोडता सर्व चालते. त्यामुळे पश्‍चिमी संस्कृतीमध्ये व्हॅलेंटाईन डे, ‘फ्रेंडशीप डे’ हे प्रकार आहेत. आजकाल आपलेकडे सुद्धा हे प्रकार वाढत आहे. पण, या प्रकारात रक्षाबंधनसारखा पवित्र नात्याचा सण हरविल्या जाऊ नये, याची सर्वांनीच आतापासूनच काळजी घेणे गरजेचे आहे.

 

निसर्गाने मानवाला जातिभेद, वर्णभेद, धर्मभेद शिकविला नाही व निसर्गाला तो मान्य सुद्धा नाही. लिंगभेद म्हणजे स्त्री-पुरुष हाच एकमेव भेद मानवामध्ये आहे. पशुपक्ष्यांमधे सुद्धा हाच भेद आहे, पण त्यांच्यावर निसर्गाने मर्यादा घातलेल्या आहेत. मानवालाही तेवढेच स्वातंत्र्य दिलेले आहे. पशुपक्ष्यांना विषयसुखापेक्षा सृष्टीचे चक्र चालविण्यासाठी कर्तव्यपूर्तीपुरताच आनंद उपभोगण्याची मर्यादा घातलेली आहे. इकडे मानवामध्ये स्त्रीकडे संयम, लाज या अंतर्भूत आहेत, तर पुरुष पूर्णपणे स्वतंत्र आहे. यामुळे पुरुषप्रधान संस्कृती सुरू आहे.

 

पौराणिक काळात स्त्रियांना अधिकार व स्वातंत्र्य होते म्हणूनच स्वयंवर होत होते. त्या पुढील काळ स्त्रियांसाठी फारच असुरक्षित असा राहिलेला आहे. मोगलकालीन सहाशे वर्षांचा इतिहास बघता स्त्रियांसाठी फार वाईट दिवस होते. मोगलांनी केलेल्या युद्धामध्ये त्यांचा प्रामुख्याने हेतू धर्मप्रसार, संपत्ती व सुंदर स्त्री असा होता. इतिहासातील काही युद्धे तर सुंदर रजपूत स्त्रियांसाठी झालेली आहेत. सतीची कुप्रथा सुद्धा यांच्या धाकानेच आलेली होती. रजपूत योद्ध्यांनी युद्ध हरल्यानंतर व आपले पती युद्धात कामी आल्याची बातमी मिळाल्यानंतर क्षणाचाही विलंब न करता स्त्रिया विहिरीत उडी घेऊन मरण पत्करायच्या. अशा बिकट काळात बहिणी फार असुरक्षित होत्या व याच काळात रक्षाबंधन हा सण आलेला आहे. रजपूत समाजात आजही या सणाला फार महत्त्व आहे. भावाला बहिणीने राखी बांधल्यावर तिच्या रक्षणासाठी भावाने जीव सुद्धा दिलेला आहे. राखीचे बंधन म्हणजे एक जबाबदारी समजतात, त्यामुळे रजपूत बहिणी व भाऊ बाहेर कुणालाही राखी बांधणार व बांधून घेणार नाही.

 

इंग्रजांच्या काळात दीडशे वर्षे पारतंत्र्यात पुरुषांनी जुन्या अनुभवाप्रमाणे स्त्रियांना घरामध्येच ठेवले. बालविवाह होत होते. विधवांना एकतर सती किंवा मुंडन करून विद्रूप जगावे लागायचे. पुरुषांनी मात्र मन मानेल तसे दोन-तीन लग्न करून उपभोग घ्यायचा. या काळात पुरुषांच्या मनमानी व्यभिचाराला टोक नव्हती व जणू दोष होता तो स्त्रीचाच. काळानुरूप सर्व बदलत असते. तसे सर्व आज बदल झालेले आहेत. कित्येक समाजांत स्त्रिया लग्नामध्ये जात नव्हत्या. आज समाजातील प्रत्येक कार्यात स्त्रियांची उपस्थिती लक्षणीय असते. स्त्रियांना राजकारणापासून तर नोकरीमध्ये पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून कामे करावी लागतात. कित्येक जबाबदारीच्या पदांवर स्त्रिया विराजमान आहेत. सरळ भाषेत स्त्रियांना, मुलींना पूर्ण स्वातंत्र्य मिळालेले आहे. या स्वातंत्र्यापायी समाजात होणारा व्यभिचार सुद्धा दुर्लक्षिला जातो आहे. फॅशन, वेशभूषा, केशभूषा, सौंदर्यप्रसाधनाच्या सर्व गोष्टींचा उपभोग स्त्रिया मुक्तपणे घेत आहेत. इकडे तंत्रज्ञान, मीडिया, इंटरनेट, मोबाईल, टी.व्ही. सुद्धा घरोघरी पोहोचले आहे. सर्व गोष्टीला दोन बाजू असतात. त्यापैकी एक बाजू चांगली तर एक वाईट असते. त्यात अजूनही पुरुषप्रधान संस्कृतीचाच बोलबाला आहे.

 

सर्व मनुष्यजाती धर्म, समाज, जात यानुसार विभागलेले आहे. आपण आंतरजातीय संबंध काळाची गरज समजून चालवून घेऊ, परंतु आंतरधर्मीय म्हणजे हिंदू, मुस्लिम, ख्रिश्‍चन यापैकी जर विवाह होत असतील, तर विचार करण्याची गरज आहे. खरे तर धर्म म्हणजे न्याय व अधर्म म्हणजे अन्याय. आपण हिंदू म्हणजे सिंधू नदीवरच्या लोकांची संस्कृती आहे. आपली संस्कृती मूर्तिपूजक आहे. आपण संस्कृती व धर्माकडून जीवन जगण्यासाठी एक आचारसंहिता ठरवीत असतो. संस्कृतीकडून चांगले आचार विचार, सभ्यता मिळते. म्हणून आपण संस्कृतीच्या चौकटीत जगतो. दुसरीकडे या संस्कृतीवर आक्रमण करून आपले आचार-विचार भ्रष्ट ठरवून हिंदू संस्कृतीच्या विपरीत तयार झालेली ही परकीय संस्कृती आहे. परकीय आक्रमकांनी जबरदस्तीने फूस लावून ही संस्कृती राबविली आहे. काहींनी नाईलाजाने ही संस्कृती स्वीकारली आहे. हिंदू संस्कृतीने सर्वांना समान अधिकार व स्वातंत्र्य दिले. पण, मुस्लिम संस्कृतीने कधीही कुणाला स्वातंत्र्य दिलेले नाही. यावर तस्लीमा नसरीनसह अनेक मुस्लिम लेखकांनीच प्रकाश टाकला आहे. प्रत्येकाला स्वातंत्र्य प्रिय असते. पण, ते स्वातंत्र्य अजूनही काही कट्टरपंथी द्यायला तयार नाहीत. आज आधुनिक युगामध्ये सक्ती चालणार नाही, म्हणून प्रेमाने धर्मांतराचा विषय राबविण्याचा अतिरेकी गटांनी घाट रचला आहे. कॉलेज तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून लग्ने होत आहेत. स्वामी विवेकानंद म्हणतात की, एक हिंदू धर्मांतरित होणे म्हणजे भारताच्या शत्रूमध्ये एकने वाढ करणे होय. त्यांच्याजवळ पैसा आला की त्यांना प्रॉपर्टीपेक्षा दुसरे लग्न करण्यामध्ये जास्त रस असतो. त्यासाठी त्यांनी तसे कायदेही करवून घेतले आहे. त्यांना दुसरे लग्न करण्याची मुभा आहे. अरब देशात आजही एक अरब पाच-पाच लग्न करतो. कित्येक गरीब मुस्लिम मुली विकत घेऊन त्यांनी आपल्या देशात नेल्या. उपभोग घेऊन झाल्यावर भिकेला लावल्या आहेत, ही वस्तुस्थिती आहे. दुबईसारख्या शहरात भीक मागणार्‍या स्त्रिया व मुले सर्व भारत, पाकिस्तान व बांगला देशमधील आहेत. इकडे अतिरेक्यांनी पोसलेले तरुण प्रेमाचे जाळे हिंदू मुलींवर डोळसपणे टाकतात. त्यांना हिंदू मुलीसोबत विवाह म्हणजे ‘जन्नत’ वाटते. श्रीमंत पण कमकुवत समुदायाच्या मुलींना ते हेरतात. आंतरजातीय विवाहाला कुणाचाही विरोध नाही, नसावा. कारण जाती, पंथ कितीही वेगळे, भिन्न असले तरी सर्वांची नाळ हिंदू संस्कृतीशी जुळलेली आहे. इतकेच काय जर आपण शीख, बुद्ध, जैन जरी वेगळे धर्म म्हणत असलो, तरी ते परकीय नाही. या देशाचे शत्रू नाही. त्यांना या देशाबद्दल भरभरून प्रेम आहे. हे सर्व धर्म एकमेकांच्या श्रद्धा, देवतांचा आदर ठेवतात. मुस्लिमांतील एक गट मात्र हिंदू देवतांचा का अपमान करतो, हे कळायला मार्ग नाही. या भारतातील जनतेचा राष्ट्रीय प्राणी गाय असायला हवा होता, इतकी आम्हास गाय पूजनीय आहे. त्या गायीची कत्तल सरेआम होता होता नामशेष होण्याची पाळी आलेली आहे.

 

आपले संभाजी राजे अत्यंत शूर, तेजदार, राजबिंडे होते. त्यांचेवर औरंगजेबाची मुलगी भाळली होती. औरंगजेबाने त्यासाठी त्यांना कैद करून मुस्लिम होण्याचा आग्रह धरला व जावई बनण्याचे आमिष दिले. संभाजी राजांनी धर्मपरिवर्तनाला विरोध केला तेव्हा त्यांचे हाल हाल करून हत्या केली. त्यांनी प्राणत्याग केला पण धर्म त्यागला नाही.

 

तेव्हा भगिनींनो, आज रक्षाबंधनानिमित्त संकल्प करा. आयुष्यात प्रेमात पडण्याचा योग आला, तर डोळसपणे प्रेम करा. एकवेळ प्राण गेला तरी चालेल, पण धर्म बाटू देऊ नका. मरणाने बहिणीला विसरता येईल, पण असे काही घडले तर भाऊ, आई-वडील यांना शल्याने जगणे असह्य करू नका. संकल्प दृढ करण्यासाठी तस्लीमा नसरीनची लज्जा नावाची कादंबरी जरूर वाचा. आपल्या ग्रुपमधे असे काही घडत असेल, तर ताबडतोब आपल्या मैत्रिणीला सतर्क करा. हा एका मोठ्या भावाचा रक्षाबंधनानिमित्त भेट म्हणून अनमोल सल्ला समजावा.

 

- संजय अलकरी

 

अमरावती