Tarun Bharat   Like Minded

Updated at: 22/05/2013 12:37:38
     
तुमचे शहर निवडा

निर्देशांकाची कमाई सुरूच

तारीख: 8/1/2012 7:08:21 PM

 

वृत्तसंस्था

 

मुंबई, १ ऑगस्ट

 

कमाईचे सत्र सलग चौथ्या दिवशीही कायम ठेवताना, मुंबई शेअर बाजारातील निर्देशांकाने आज २१ अंकांची कमाई केली. अमेरिकन फेडरल बँकेच्या बैठकीतून काहीही निष्पन्न निघणार नाही, अशी अपेक्षा लक्षात घेऊनच, गुंतवणूकदारांनी आज कुठलीही जोखीम स्वीकारण्याचे टाळले.

 

बाजारातील आजची सुरुवात अतिशय संथगतीने झाली. त्यानंतरही दिवसभर बाजारात वेगवान उलाढाली झाल्या नाही. फेडरल रिझर्व्ह बँकेची बैठक हाच गुंतवणूदारांपुढील मुख्य मुद्दा होता. दिवसभराच्या या उलाढालीत २१.२० अंकांच्या कमाईसह निर्देशांक शेवटी १७,२५७.३८ या स्तरावर बंद झाला.

 

भारतीय रिझर्व्ह बँक आपल्या व्याजदरात कपात करेल, या आशेवर निर्देशांकाने गेल्या तीन सत्रात सुमारे ६०० अंकांची कमाई केली होती. शेअर बाजारातील ३० कंपन्यांपैकी भेळ, टाटा पॉवर्स, स्टेट बँक आणि एचडीएफसी यासह १६ कंपन्यांचा फायदा झाला. तर, सीआयएल, ओएनजीसी, हिरो मोटर्स, टीसीएस आणि टाटा स्टिल यासह १४ कंपन्यांचे नुकसान झाले.

 

राष्ट्रीय शेअर बाजाराचे प्रतिनिधित्व करणार्‍या निफ्टीच्या निर्देशांकातही ११.५० अंकांची कमाई झाली. दिवसभराच्या उलाढालीनंतर हा निर्देशांक ५२४०.५० अंकांवर स्थिरावला.