Tarun Bharat   Like Minded

Updated at: 22/05/2013 02:45:21
     
तुमचे शहर निवडा

सोने, चांदीत घसरण

तारीख: 8/3/2012 8:28:46 PM

 

वृत्तसंस्था

 

मुंबई, ३ ऑगस्ट

 

राखीचा सण साजरा होताच गुंतवणूकदार व व्यापार्‍यांनी पुन्हा एकदा खरेदीत उदासिनता दाखविल्यामुळे आणि उद्योगांनीही उचल कमी केल्याने मुंबई सराफा बाजारात आज सोने व चांदीच्या किमतीत घसरण झाली.

 

स्टॅण्डर्ड सोन्याच्या प्रति तोळा किमतीत ११५ रुपयांची घसरण झाली. गुरुवारी हा भाव २९,८४५ रुपये होता. तो आज २९,७३० रुपयांवर आला. शुद्ध सोन्याची किमत ९५ रुपयांनी खाली आल्याने हा भाव गुरुवारच्या २९,९७५ रुपयांवरून आज २९,८८० रुपयांपर्यंत घसरला.

 

चांदीच्या प्रति किलो किमतीतही ६६५ रुपयांची घसरण झाली. गुरुवारी चांदीचा भाव ५३,९६० रुपये होता. तो आज ५३,२९५ रुपयांवर आला.

 

दिल्लीच्या सराफा बाजारातही सोन्याच्या किमतीत शंभर रुपयांची घसरण झाल्याने हा भाव ३०,२०० रुपयांवर आणि चांदीच्या किमतीत ८०० रुपयांची घसरण झाल्याने तो ५३ हजारांवर आला.