अवैध दारू पुरवठा आला अंगलट

    दिनांक :29-Mar-2024
Total Views |
तभा वृत्तसेवा
कळंब, 
Illegal liquor supply वर्धा जिल्ह्यामध्ये कळंब तालुक्यातून मोठ्या प्रमाणामध्ये दारूचा पुरवठा केला जातो. कळंब बसस्थानक नजीक असलेल्या एका ट्रेडर्समधुन वर्धा येथे दारू पार्सल होत असल्याचे वर्धा पोलिस अधीक्षकांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी या संदर्भात शासन स्तरावर कारवाई करता पाठपुरावा केला.
 


Illegal liquor supply
 
त्या पाठपुराव्याचा कळंब शहरांमध्ये परिणाम दिसून आला. राज्य उत्पादन शुल्क विभाग यवतमाळ यांनी एमपी ट्रेडर्स इथून मोठ्या प्रमाणामध्ये दारूचा पुरवठा वर्धा जिल्ह्यामध्ये होते. या कारणास्तव तो दारू विक्रीचा परवाना दोन महिन्याकरता गोठवून दुकान सीलबंद केले आहे. Illegal liquor supply परंतु कळंब तालुक्यामध्ये चिंचोली, सावरगाव, सातेफळ, वर्धा नदी काठावरील बियरबार येथून सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये वर्धा जिल्ह्यामध्ये दारूचा पुरवठा होत असल्याची माहिती आहे. याकडे दुर्लक्ष होत असल्याची नागरिकांमध्ये चर्चा आहे.