राजकारण जनसेवेचा मार्ग - आ. विनोद अग्रवाल

चाबी संघटनेचा कार्यकर्ता मेळावा

    दिनांक :29-Mar-2024
Total Views |
गोंदिया,
Vinod Agarwal चाबी संघटनेचा कार्यकर्ता थकत नाही, कुणापुढे नतमस्तकही होत नाही, शेतकरी, मजूर, कामगार, सर्वसामान्य गरजूंच्या मदतीसाठी तो धावून येतो. आज अनेक पुढारी राजकारण समाजकारण म्हणून करतात यातूनच जनसेवा घडते, असे प्रतिपादन आमदार विनोद अग्रवाल यांनी केले. चाबी संघटना जनता की पार्टीच्या येथील जलाराम सभागृहाम पार पडलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.
 


agrwal 
 
अग्रवाल पुढे म्हणाले गोरगरिब, कष्टकर्‍यांच्या चेहर्‍यावर आनंद निर्माण करण्यासाठी कार्य करा. आपले राजकारण आणि समाजकारण हे लोकसेवेसाठी आणि जनहितासाठी कार्यकर्त्याने झटावे, लढावे असे आवाहन करीत कोणत्याही जाती आणि धर्माच्या विळख्यात न पडता सर्व धर्म समभावाची भावना मनात बाळगून सर्व जाती, धर्म पंथाच्या नागरिकांना न्याय मिळवून देण्याचे कार्य करण्याचे ते म्हणाले. यावेळी अग्रवाल यांनी त्यांच्या कार्यकाळातील विकास कार्याचा पाढा वाचला. खरे समाजसेवक कोविड काळात सक्रियतेने कार्यरत होते परंतु केवळ निवडणुकीच्या तोंडावर पावसाळ्यात निघणार्‍या बेडकांसारखे टरटर करणारे काही स्वयंभू सामाजिक कार्यकर्ते सध्या बघायला मिळत असल्याचे त्यांनी सांगीतले. स्वार्थी राजकारण्यांपासून सावध राहण्याचा सल्लाही अग्रवाल यांनी कार्यकर्त्यांना दिला. काही पुढार्‍यांना भूमिपूजन करण्याच्या छंद असून इतरांनी मंजूर केलेल्या कामांचे श्रेय घेण्यासाठी कामांच्या खर्चापेक्षा जास्त जाहिराती, प्रसार व प्रचारावर खर्च केला जात असून अशा भूमिपूजन वीरांपासून कार्यकर्त्यांनी सतर्क रहाण्याचे त्यांनी सांगीतले. कामांचा गाजावाजा किंवा भूमिपूजन न करता संपूर्ण कामांचा एकत्रितपणे भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा आयोजित करून नागरिकांचा वेळ आणि पैसा वाचविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे अग्रवाल यांनी स्पष्ट केले.Vinod Agarwal कार्यक्रमाला चाबी संघटनेचे अध्यक्ष छत्रपाल तुरकर, संयोजक भाऊराव उके, शहर अध्यक्ष कशिश जयस्वाल, मार्गदर्शक धनंजय तुरकर, पंस सभापती मुनेश रहांगडाले, महिला आघाडी अध्यक्ष चैतालीसिंह नागपुरे,किसान आघाडीचे जिलाध्यक्ष मोहन गौतम, शिव शर्मा, घनश्याम पानतावणे, इंदलसिंह राठोड, लखन हरीणखेडे, चेतन बहेकार, रेखा लिल्हारे, जिप सदस्य नंदा वाढीवा, दीपा चंद्रिकापुरे, वैशाली पंधरे, पंस सदस्य शैलजा सोनवाने, विद्याकला पटले, शशि कटरे, मिनाक्षी बारलिंगे, जितेश्वरी रहांगडाले, सोनुला बरेले, पंस सदस्य कनीराम तावाडे, हिरामण डहाट यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.