युवकांनो मतदानाचा आपला अधिकार वापरा : किशोर गज्जलवार

    दिनांक :29-Mar-2024
Total Views |
तभा वृत्तसेवा
वणी,
Kishore Gajjalwar लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील चंद्रपूर-वणी लोकसभा निवडणुकीमध्ये नवमतदारांचे प्रमाण वाढावे व युवकांनी मतदान प्रक्रियेत उस्फूर्त सहभाग घेऊन मतदानाचा अधिकार वापरावा, असे आवाहन येथील गटविकास अधिकारी तथा नोडल अधिकारी किशोर गज्जलवार यांनी केले. ते येथील लोकमान्य टिळक महाविद्यालयात नवमतदारांसाठी घेण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलत होते.
 
 
Kishore Gajjalwar
 
19 एप्रिलला होणार्‍या लोकसभा निवडणुकीत वणी विधानसभा क्षेत्रातील मतदानाची टक्केवारी वाढावी. यासाठी मतदार जाणीवजागृती अभियानांतर्गत सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी वणी यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम सुरू आहेत. या अंतर्गत सर्व महाविद्यालयांमध्ये नवमतदारांशी संपर्क साधून युवकांची मतदानातील टक्केवारी वाढवण्यासाठी उपक्रम सुरू आहे. Kishore Gajjalwar या उपक्रमाचा एक भाग म्हणून येथील टिळक महाविद्यालयात घेण्यात आलेल्या कार्यक्रमात किशोर गज्जलवार यांनी उपस्थित महाविद्यालयीन युवकांना लोकशाहीमध्ये मतदानाचे महत्व समजावून सांगत लोकप्रतिनिधी निवडण्यासाठी मतदानाचा आपला अधिकार वापरणे किती महत्वाचे आहे. हे समजावून सांगत मी मतदान करणार हा निर्धार व्यक्त करण्यासाठी घेण्यात आलेल्या स्वाक्षरी मोहिमेत या नवमतदारांनी स्वाक्षरी करून मतदान करण्याचा निर्धार व्यक्त केला. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रसाद खानझोडे प्रामुख्याने उपस्थित होते.