मुंबईवर कंट्रोल ठेवण्यासाठी काँग्रेसने घेतला विदर्भाचा बळी

    दिनांक :19-Apr-2024
Total Views |
- अ‍ॅड. श्रीहरी अणे यांचा पत्रपरिषदेत घणाघात

वर्धा, 
मागील अनेक वर्षांपासून स्वतंत्र विदर्भाची मागणी होत आहे. यासाठी अनेक आंदोलने झालीत. वेगळ्या विदर्भाची घोषणा करून अनेकांनी मताधिक्य मिळविले. सत्तेत आले. मात्र, काँग्रेस काळात मुंबईवर कंट्रोल ठेवण्यासाठी काँग्रेसने विदर्भाचा बळी घेतला, असा घणाघात विदर्भ राज्य आघाडीचे संस्थापक अध्यक्ष Adv. Srihari Ane अ‍ॅड. श्रीहरी अणे यांनी आज शुक्रवार 19 रोजी स्थानिक वरदा वर्घन येथे आयोजित पत्रपरिषदेत केला.  ‘तळे’गावात जन‘सागर’ लोटला
 
 
Adv. Srihari Ane
 
Adv. Srihari Ane : विदर्भ राज्य आघाडीचे लोकसभा उमेदवार आशिष इझनकर यांच्या प्रचारार्थ शुक्रवार 19 रोजी अ‍ॅड. अणे यांची साई मंगल कार्यालयात सायंकाळी 6 वाजता जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. तत्पूर्वी दुपारी 12 वाजता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. अ‍ॅड. अणे पुढे म्हणाले की, देशात परिवारदावर मोठी चर्चा सुरू आहे. मात्र, परिवारवादासह समाजवादावर सुद्धा चर्चा व्हायला पाहिजे. त्या-त्या नेत्यांच्या काळात किती फायदा झाला व नुकसान किती याचा विचार व्हावा. ही नेत्यांची निवडणूक आहे सामान्य माणसांची नाही. कोणी कितीही गॅरंटी दिली तरी गॅरंटी तोडण्यासाठीच असते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ना. नितीन गडकरी यांनीही विदर्भ राज्याची घोषणा करण्याचे आश्‍वासन दिले होते. मात्र, सत्तेत आल्यानंतर या विषयाला त्यांनीही बगल दिली, असेही ते म्हणाले.  वर्धेत काँग्रेसची केविलवाणी अवस्था : उपमुख्यमंत्री फडणवीस
 
 
Adv. Srihari Ane : स्थानिक खासदार, आमदारांनी आपल्या जिल्ह्यासाठी काय केले. आज विदर्भात किती उद्योग आले हा प्रश्‍न आहे. नोकर्‍यांची वाताहात झाली आहे. शिक्षण घेणे कठिण असतानाच शिक्षणाचे नोकर्‍यात रुपांतरण होत नाही. नागपूर सारखी शहरं रिटायर्ड माणसांच्या गावांसारखी झाली आहे. आज विदर्भात नोकर्‍याच नाही. तळागाळातील समस्या सोडविण्यासाठी तळागाळातील माणूसच निवडणुकीत उभा असला पाहिजे. विदर्भ राज्य आघाडीच्या वतीने आशिष इझनकर रिंगणात आहेत. जिंकू किंवा उत्तम मताधिक्य घेऊ, असा विश्‍वास अ‍ॅड. अणे यांनी यावेळी व्यक्त केला. पत्रकार परिषदेला, विदर्भ राज्य आघाडीचे लोकसभा उमेदवार आशिष इझनकर, अमोल कठाणे, समवयक चंद्रशेखर बडुकले, अ‍ॅड. सन्याल, निरज खांदेवाले यांची उपस्थिती होती.