मासेमारी करताना युवकाचा विद्युत धक्क्याने मृत्यू

    दिनांक :19-Apr-2024
Total Views |
- महिन्यातील दुसरी घटना

कारंजा (घा.),
मासेमारी करण्याकरिता गेलेल्या युवकाचा महावितरणच्या खाली पडलेल्या ताराला स्पर्श झाल्याने मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील नारा येथे घडली. विशेष म्हणजे, विद्युत धक्क्याने मृत्यू झाल्याची ही महिन्यातील दुसरी घटना आहे. Ankush Parise अंकुश पारिसे (23) असे मृतकाचे नाव आहे. नारा येथील पाच जण मासेमारी करण्याकरिता गेले होते. नदीतील खडकातून जात असताना डॉ. वाघ यांच्या जिनिंगच्या मागील परिसरात नदीमध्ये अंकुश हा मासे पकडत असताना खाली पडून असलेल्या महावितरणच्या विद्युत तारेला स्पर्श होऊन तो पडला.
 
 
Ankush
 
Ankush Parise : ही बाब लक्षात येताच त्याच्या सहकार्‍यांनी त्याला काठीच्या सहाय्याने तार वेगळा करून कारंजा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले. महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे तालुक्यात दुसरा बळी गेला. महावितरणच्या भोंगळ कारभाराबद्दल तालुक्यात मोठा रोष आहे. दरम्यान, याबाबतची माहिती महावितरणचे सहाय्यक अभियंता राजूरकर यांना दिली असता त्यांनी दोषी कर्मचार्‍यांवर कारवाई करण्यात येणार असून मृत व्यक्तीच्या वारसाला आर्थिक मदतीकरिता सहकार्य करण्याचे आश्‍वासन दिले. तसेच यानंतर अशी घटना घडणार नाही, याची दक्षता घेऊ अशी प्रतिक्रिया राजूरकर यांनी दिली.