वर्धेत काँग्रेसची केविलवाणी अवस्था : उपमुख्यमंत्री फडणवीस

    दिनांक :19-Apr-2024
Total Views |
वर्धा, 
ही भूमी स्वातंत्र्याची भूमी आहे, इथे प्रथम तिरंगा ध्वज फडकवला गेला. ही महात्मा गांधींची भूमी आहे. महात्मा गांधींनी स्वातंत्र्यानंतर काँग्रेस विसर्जित करा असे सांगितले होते. शरद पवारांनी वर्धेला काँग्रेस मुक्त केले. आता काँगे्रसची केविलवाणी अवस्था पाहायला मिळते. या लोकसभेत रामदास तडस हॅट्ट्रीक करतील तर नवनीत राणा भरघोस मतांनी निवडून येतील असा विश्‍वास Devendra Fadnavis उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तळेगाव येथे आयोजित सभेत व्यक्त केला. 
 
Devendra Fadnavis
 
यावेळी भाजपाचे वर्धा जिल्हाध्यक्ष सुनील गफाट, खासदार अनिल बोंडे, आ. दादाराव केचे, आ. समीर कुणावार, आ. पंकज भोयर, आ. प्रताप अडसड, आ. देवेंद्र भुयार, भाजपाचे लोकसभा प्रमुख सुमीत वानखेडे, रवी राणा, सागर मेघे, माजी खा. सुरेश वाघमारे, सरिता गाखरे, सुबोध मोहिते, उपेंद्र कोठेकर, संजय गाते, अमरावतीचे भाजपा जिल्हाध्यक्ष किरण पातुरकर, वैशाली येरावार, राजू उंबरकर, अशोक शिंदे, विजय आगलावे, आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती. फडणवीस पुढे म्हणाले की, नवनीत राणा यांना तत्कालीन सरकारने हनुमान चालिसा वाचण्यापासून थांबवले होते आणि तुरुंगात पाठवले. आम्हाला नको. असे सरकार, आमचे सरकार महिलांचे आहे, आम्ही महिलांचा आदर करतो. महिलांविरोधात बोलणार्‍यांना महिलाच उत्तर देतील असे फडणवीस म्हणाले.
 
 
 
Devendra Fadnavis : बावनकुळे म्हणाले की, मोदींनी दहा वर्षांत विकसित महाराष्ट्राला पहिल्या क्रमांकावर आणण्याचे काम केले. काँग्रेसने 55 वर्षे राज्य केले. पंतप्रधान राजीव गांधी म्हणायचे की मी एक रुपया जनतेपर्यंत पोहोचवायचा, अशी सत्ता आता जनतेने काढून टाकली. एक रुपया दिल्लीहून जनतेला पाठवला जातो आणि वर्धेच्या लोकांना मिळतो, असे त्यांनी सांगितले. खा. रामदास म्हणाले की, लोअर वर्धा प्रकल्प 30 वर्षांपासून पूर्ण झाला नाही. देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदा मुख्यमंत्री झाल्यानंतर या प्रकल्पाचे काम पूर्ण केल्याचे सांगितले. पंतप्रधान नरेंंद्र मोदी यांना तिसर्‍यांदा पंतप्रधान करण्यासाठी ही निवडणूक अत्यंत महत्वाची असल्याचे ते म्हणाले.
 
 
 
Devendra Fadnavis : नवनीत राणा यांनी 500 वर्षांपूर्वी जी रामनवमी साजरी केली जात होती, तीच रामनवमी संपूर्ण देशात पाहायला मिळाली. अनेक दशकांनंतर कुणीतरी नशीब सोबत घेऊन येतं, राममंदिराच्या स्थापनेचं श्रेय कोण घेतं, काँग्रेसनं फक्त स्वत:च्या कुटुंबाला पुढे आणण्याचं काम केलं, आता आमचे नेते राहुल गांधी शहाणे झाले, कुणीतरी शहाणे झाले आहे एक होण्यासाठी बावन्न वर्षे लागतात, अशा हातात सत्ता कशी देणार? असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला. यावेळी किरण पातुरकर, आ. दादाराव केचे, खा. अनिल बोंडे, आ. समिर कुणावार, आ. प्रताप अडसड, आ. पंकज भोयर यांनीही रामदास तडस व नवनीत राणा यांना विजयी करण्याचे आवाहन केले.