माझ्यासाठी तुम्हीच मोदी : पंतप्रधान मोदी

    दिनांक :19-Apr-2024
Total Views |
- तळेगावात भाजपाची विजय संकल्प सभा

वर्धा, 
तुम्हाला प्रार्थना करायची आहे. गावाला जाल तेव्हा एक काम करा. ज्यांना घर, गॅस कनेक्शन, शौचालय मिळाले नाही, त्यांची माहिती घ्या. मला पाठवा. त्यांना सांगा, मी मोदींची गॅरंटी घेउन आलो. तिसर्‍यांदा मोदी येतील तेव्हा या सुविधा तुम्हाला मिळतील. तुम्हीच माझे प्रतिनिधी आहात. माझ्यासाठी तुम्हीच मोदी आहात, असे भावनात्मक आवाहन Prime Minister Modi पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. वर्धा लोकसभेचे भाजपा उमेदवार रामदास तडस आणि अमरावती लोकसभेच्या नवनीत राणा यांच्या प्रचारार्थ आज शुक्रवार 19 रोजी आष्टी तालुक्यातील तळेगाव (श्या.पं.) येथे आयोजित महाविजय संकल्प सभेत ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री अतुल सावे, वर्धा लोकसभेचे उमेदवार रामदास तडस, अमरावती लोकसभेचे उमेदवार नवनीत राणा, आदींची उपस्थिती होती.  वर्धेत काँग्रेसची केविलवाणी अवस्था : उपमुख्यमंत्री फडणवीस
 
 
Prime Minister Modi
 
‘तळे’गावात जन‘सागर’ लोटला  काँग्रेस-इंडी आघाडीचे विचार विकास आणि शेतकरीविरोधी राहिले आहे. त्यामुळे 2014 पर्यंत गरीब व शेतकर्‍यांचे हाल झाले. काँग्रेसमुळे देशाचे नुकसान झाले. सनातन धर्माला संपविण्याची भाषा वापरली जाते. राममंदिर लोकार्पणाचा बहिष्कार तर श्रीरामाच्या सूर्यतिलकवर शंकाही काँग्रेस-इंडी आघाडीने घेतली. त्यामुळे काँग्रेसच्या पापांचा हिशेब आता तुम्हालाच करायचा आहे, असे आवाहन त्यांनी केले. महात्मा गांधी यांचा जन्म गुजरात येथे झाला असला तरी वर्धा ही त्यांची कर्मभूमी आहे. स्वातंत्र्यापूर्वी महात्मा गांधींनी विकसित भारत आणि आत्मनिर्भर भारताचे स्वप्न बघितले होते. आज देश निर्णायक पावले उचलत असताना यात वर्धेचाही वाटा हवा आहे. काँग्रेस काळात गावागावात वीज, पाणी, सडक पोहचली नाही. त्यामुळे गरीब, शेतकरी, शेतमजूर, महिलांना याचा नाहक त्रास सहन करावा लागला. पण, हे चित्र 2014 नंतर पूर्णत: बदलले. देश सध्या मोदींची गॅरंटी बघतोय. त्यामुळे तुम्हीच मोदी बनून माझी मदत करा, असे Prime Minister Modi आवाहन त्यांनी केले.
 
 
 
Prime Minister Modi : तिसर्‍यांदा सत्तेत आल्यास काही विकास राहिल्यास पुढील पाच वर्षांत गरिबांसाठी नवीन घर, प्रत्येक घरापर्यंत पाणी, तर येत्या काळात पाईपने घराघरात गॅस पोहचवू. वंदे भारत सारखी आधुनिक रेल्वे आणि बुलेट ट्रेन सुद्धा चालणार. कितीही अडचणी आल्या तरी गॅरंटी पूर्ण करू. बहाणेबाजी करणार नाही. एकट्या वर्धेत दीड लाख महिला बचतगट समुहात सहभागी आहेत. वर्धेच्या महिलांच्या उत्थानासाठी 1200 कोटी दिले. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार सरकार आपल्या सेवेसाठी कार्य करीत आहे. वर्धा क्षेत्रात वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे लाईन तयार झाली आहे. धामणगाव स्टेशनचा पुनर्विकास सुरू आहे. अमरावतीत टेक्सटाईल पार्क बनतोय तर सिंधीत ड्रायपोर्टचं काम सुरू आहे. विकास काँग्रेस आणि इंडी गठबंधनच्या पचनी पडत नाही आहे. भाजपासमोर काँग्रेस आणि इंडी गठबंधन यांच्याकडे मुद्देच नसल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितले. विरोधकांना धडा शिकविण्यासाठी भाजपाचे वर्धेचे उमेदवार रामदास तडस आणि अमरावतीच्या नवनीत राणा यांना रेकॉर्ड ब्रेक मताधिक्क्याने निवडून आणण्याचे आवाहनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी केले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उमेदवार रामदास तडस, नवनीत राणा यांनीही मतदानाचे आवाहन केले. संचालन रेणुका देशकर यांनी तर आभार अर्चना वानखेडे यांनी मानले. कार्यक्रमाला वर्धा व अमरावती जिल्ह्यातील लाखोचा जनसमुदाय उपस्थित होता.
 
 
तिसर्‍यांदा आलो, वर्धेकरांचे प्रेम वाढतेच आहे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणाची सुरूवात मराठीतून केली. यावेळी त्यांनी आज चैत्र एकादशी असल्याचे सांगून विठ्ठलाच्या चरणी नमन केले. जय गुरुदेव म्हणून भाषणाला सुरूवात करताना त्यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, गाडगेबाबा, लहानुजी महाराज, तेलंगराय महाराज, मायबाई, आडकुजी महाराज, आष्टी येथील शहीद यांचा आवर्जुन उल्लेख केला.