संगणक संच चोर पोलिसांच्या जाळ्यात

    दिनांक :29-Apr-2024
Total Views |
गोंदिया, 
Computer thieves शहरातील गोंदिया पब्लिक शाळेतून संगणक संच चोरीचा उलगडा गुन्हे प्रगटीकरण शाखेने केला आहे. 21 एप्रिल रोजी घडलेल्या या घटनेत पथकाने रविवार 28 एप्रिल रोजी एका आरोपीला अटक करून त्याच्या ताब्यातून संपूर्ण माल जप्त करण्यात आला आहे. तन्मय प्रमोद शंभरकर (20) रा. जनता कॉलनी, गोंदिया असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
 

theft 
 
गोंदिया पब्लिक शाळेच्या संगणक कक्षाच्या खिडकीचे काच तोडून तन्मय शंभरकर याने दोन अल्पवयीन मुलांच्या मदतीने 3 मॉनिटर, 2 सीपीयू, 1 लॅपटॉप, 1 लॅपटॉप कुलिंग पेंड, 2 स्पीकर, 1 कॉलन माईक, 2 टीव्ही पेन, 2 कीबोर्ड, 1 टूल किट सेट असा 52 हजार 500 रुपयांचा माल चोरून नेला होता. यासंदर्भात शहर पोलिसात भादंवि कलम 454, 457, 380 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.Computer thieves पोलिस निरीक्षक चंद्रकांत सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनात गुन्हे प्रकटीकरण पथकातील सहायक पोलिस निरीक्षक सोमनाथ कदम यांनी तपासाची चक्रे फिरवून आरोपी तन्मय शंभरकर याला रविवारी बेड्या ठोकल्या. चोरीत त्याला दोन अल्पवयीन बालकांनी सहकार्य केल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली. आरोपीजवळून संपूर्ण माल जप्त करण्यात आला आहे.