मेयोची नवी प्रशासकीय इमारत तयार

    दिनांक :29-Apr-2024
Total Views |
-जूनमध्ये दोन मजल्यांत अधिष्ठाता कार्यालय
- प्रत्यक्ष उद्घाटन जुलैत

नागपूर, 
Indira Gandhi Government Medical College : इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाची नवी प्रशासकीय इमारत तयार झाली असून जून महिन्यात पहिल्या दोन मजल्यांवर कार्यालयीन कामकाज सुरू झालेले असेल. नागपुरातील सर्वात पहिला दवाखाना (1905 मध्ये स्थापना ) मेयो. कालांतराने त्याचे इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात रूपांतर झाले. विस्तीर्ण जागा असली तरी मेडिकल कौंसिल ऑफ इंडियाच्या निकषांप्रमाणे प्रशासकीय इमारतीची गरज होती. महाराष्ट्र शासनाने 49 कोटी रुपये मंजूर केले. त्यातून मे 2019 मध्ये (तळ + 6 मजले) इमारतीचे बांधकाम सार्वजनिक बांधकाम खात्यामार्फत सुरू झाले.
 
 
meyo

 
Indira Gandhi Government Medical College  : कोरोनामुळे बांधकाम थांबले होते. मात्र, कोरोना गेल्यानंतर ते सुरू झाले. ही नवी सहा मजली इमारत उभी झाली आहे. मात्र, पाणी, वीज, फर्निचर व इतर आवश्यक त्या मूलभूत सोयी-सुविधा निर्माण कार्य सुरू आहे. गेल्या वर्षी सातवा मजला मंजूर होऊन 16.04 कोटी रुपये निधी मिळाला. त्यामुळे आधी सातवा मजल्याचे बांधकाम करावे लागणार असल्याने लिफ्ट व सर्व सोयी- सुविधांसह सुसज्ज इमारतीचे उद्घाटन जुलैत होण्याचा विश्वास अधिकार्‍यांनी व्यक्त केला.
जून महिन्याात प्रवेश
सध्याची प्रशासकीय इमारत जुनी असून ती अपुरी पडत असल्याने सर्वांनाच अडचण होत आहे. ही अडचण लक्षात घेता नव्या इमारतीच्या दोन मजल्यांवर अधिष्ठाता, अधीक्षकांचा कक्ष, प्रशासकीय कार्यालय तेवढे जूनमध्ये स्थानांतरित होणार आहे. तळ मजल्यावर अधिष्ठाता कक्ष राहील. क्लिनिकल व पॅरा-क्लिनिकल विभाग, 250 व 350 आसन क्षमतेचा, असे दोन व्या‘यान कक्ष, मायक्रोबॉयलॉजी, पॅथालॉजी, फार्माकोलॉजी, फॉरेन्सिक सायंस आदींच्या प्रयोगशाळा, वर्गखोल्या, मुले व मुलींसाठी स्वतंत्र खोल्या, कॅफेटेरिया राहतील, या नव्या प्रशासकीय इमारतीत राहणार असल्याचे अधिष्ठाता डॉ. रवि चव्हाण यांनी सांगितले.