समर कॅम्पमुळे हरविले मामाचे गाव

    दिनांक :29-Apr-2024
Total Views |
गोंदिया,
summer camp परीक्षा संपली की मुलांना मजामस्ती करायला आवडते. परंतु, आज पालक मुलांची परीक्षा संपली की, लगेच पाल्याला समर कॅम्पमध्ये पाठवितात. त्यामुळे उन्हाळ्यात मामाच्या गावाकडे वळणारी पावले समर कॅम्पकडे वळलेली दिसतात. आजच्या स्पर्धेच्या युगात आपला पाल्य मागे राहू नये व त्याचा सर्वांगिण विकास व्हावा हा प्रत्येक पालकाचा प्रयत्न असतो. त्याकरीता मोठी रक्कम खर्च करायची तयारीही करतो.
 

summer camp 
 
परीक्षा संपली लगेच पाल्यांना समर कॅम्पमध्ये दाखल करतात. यात त्यांचे निरागस बालपण व उन्हाळ्याच्या सुट्टीतले ते मामाचे घर हरवते. पूर्वी समर कॅम्प हा प्रकार नव्हताच. मुलांना कधी एकदाची परीक्षा संपते व मामाच्या गावाला जातो, असे व्हायचे. मामा-मामी, आजी-आजोबा हवे तेवढे लाड पुरवायचे. सकाळ-संध्याकाळी शेत किंवा गावात फेरफटका मारायची, रात्री आजीआजोबांच्या कुशीत शिरुन ऐतिहासिक, पौराणिक गोष्टी ऐकायच्या. त्यातूनच खरा व्यक्तीमत्व विकास साधला जायचा. परंतु या सर्वांना आजची मुले मुकत आहे. शाळा सुरु झाली की दप्तराचे ओझो व परीक्षा संपली की समर कॅम्पचे ओझे.summer camp त्यामुळे मामाचे घर मुलांपासून दूर होत चालले आहे. यामुळे मुलांचा विकास खुंटको की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे.