आता सीईटीमुळे शॉर्टहँड परीक्षा जाणार लांबणीवर

    दिनांक :29-Apr-2024
Total Views |
तभा वृत्तसेवा
यवतमाळ, 
CET exam संगणक टंकलेखन व लघुलेखन परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या रिपीटर विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देण्यासाठी पुढचे 6 महिने थांबावे लागणार नाही. येत्या जून 2024 मध्ये होणार्‍या परीक्षेनंतर रिपीटर विद्यार्थ्यांसाठी पुढील 3 महिन्यांत परीक्षेचे आयोजन करण्याबाबत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद सकारात्मक असून, त्या दृष्टीने नियोजन केले जात आहे. तर दुसरीकडे प्रथमच संगणकावर होणार्‍या शॉर्टहँड परीक्षेचे आयोजन मात्र सीईटी परीक्षेमुळे लांबणीवर पडणार आहे.
 
 
CET exam
 
दरम्यान, जून व डिसेंबर महिन्यात या परीक्षा घेण्यात याव्या अशा स्वरूपाच्या मागणीचा प्रस्ताव परिषदेने सादर केला आहे. राज्य परीक्षा परिषदेतर्फे सध्या एप्रिल व ऑक्टोबर या महिन्यात वर्षातून दोनवेळा संगणक टंकलेखन आणि लघुलेखन परीक्षेचे आयोजन केले जाते. या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांस पुढचे सहा महिने वाट पाहावी लागते. त्यामुळे अशा रिपोर्टस्ची पुढील तीन महिन्यांनी परीक्षा घेण्यात येणार आहे. CET exam यासह परीक्षा परिषदेतर्फे एप्रिल आणि ऑक्टोबरमध्ये घेण्यात येणार्‍या परीक्षा जून आणि डिसेंबर महिन्यात आयोजित कराव्यात, असा प्रस्ताव शिक्षण विभागाला पाठवण्यात आला आहे. मशिनचा वापर टाळून आता संगणक टंकलेखन परीक्षा देणार्‍यांची संख्या वाढत आहे. तसेच जून 2024 मध्ये पहिल्यांदा लघुलेखन परीक्षाही संगणकावर घेण्यात येणार आहे. सरासरी दीड ते दोन लाख विद्यार्थी परीक्षा अर्ज भरतात. त्यामुळे परीक्षेच्या आयोजनासाठी संगणक लॅबची आवश्यकता आहे. एप्रिलमध्ये एमएच-सीईटीसह इतर अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा असल्याने परिषदेला विविध जिल्ह्यात पुरेशा संगणक लॅब मिळत नाहीत. त्यामुळे जून आणि डिसेंबरमध्ये परीक्षेचे आयोजन करावे. यासाठी प्रस्ताव तसेच परीक्षेसाठी सुधारित नियमावलीही शिक्षण विभागाकडे पाठवण्यात आली आहे.