पंचनामे करुन नुकसान भरपाई द्या

    दिनांक :29-Apr-2024
Total Views |
तिरोडा, 
Unseasonal rain तालुक्यातील कवलेवाडा जिल्हा परिषद क्षेत्रात 23 व 28 एप्रिल रोजी झालेल्या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात पीकाचे नुकसान झाले. या नुकसानीचा तातडीने पंचनामा करुन नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
 

panchname 
 
तालुक्यात धापेवाडा सिंचन प्रकल्पाच्या माध्यमातून कवलेवाडा जिल्हा परिषद क्षेत्रासह परिसरात रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात धान पीक घेण्यात आले आहे. मात्र 23 व 28 एप्रिल रोजी झालेल्या अवकाळी पावसामुळे अनेक शेतकर्‍यांचे धानपीकाचे मोठे नुकसान झाले. तसेच वादळी वार्‍यामुळे अनेकांच्या घरावरील टिनाचे पत्रे उडाले.Unseasonal rain त्यामुळे नागरिकांना नुकसान सहन करावा लागले. प्रशासनाने ज्या शेतकर्‍यांचा धानपीकाचे नुकसान झाले, तसेच ज्यांच्या घरावरील टिनाचे पत्रे उडाले त्याचे तातडीने पंचनामे करुन नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी व नागरिकांनी केली आहे.