कापशीत सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या एटीएमवर दरोडा

    18-Jan-2019
Total Views |
पातूर: पातूर पोलिस ठाण्यांतर्गत येत असलेल्या कापशी येथे सेंट्रल बँक ऑफ इंडियाच एटीएम फोडून जवळपास दहा लाख रुपये अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना आज सकाळी साडेतीन ते चारच्या सुमारास घडली असून ती घटना सकाळी पहाटे सहाच्या सुमारास उघडकीस आली आहे.
 
अकोला तालुक्यातील पोलीस स्टेशन पातुरच्या हद्दीत येत असलेल्या कापशी येथील सेंट्रल बँक ऑफ इंडिया या बँकेचे एटीएम आहे. हे एटीएम अज्ञात चोरट्यांनी फोडून त्यातील जवळपास दहा लाख रुपयाची रोख रक्कम लंपास केल्याची घटना घडली असून. सदर घटना आज पहाटे साडेतीन ते चारच्या सुमारास घडली. घटनेची माहिती पातुर पोलिसांना मिळताच घटनास्थळी धाव घेतली. एटीएमचा पंचनामा करून, श्वान पथकाला पाचारण करून, ठसेतज्ञ सुद्धा घटनास्थळ दाखल झाले आहेत याप्रकरणी सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या मॅनेजर यांच्या तक्रारीवरून पातूर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे, तसेच बाळापूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी सोहेल शेख यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करून तपासाबाबत मार्गदर्शन केले पुढील तपास पातुर पोलीस तपास करत आहेत. ग्रामीण नागरिकांना सुविधा व्हावी म्हणून गावो गावी एटीएमची सुविधा बँकांमार्फत दिली जाते. मात्र , सुरक्षा रक्षका अभावी एटीएमची सुरक्षा वाऱ्यावर सोडली जाते, व नागरिकांच्या घामाच्या पैशावर चोरटे असा डल्ला मारतात. दरम्यान, काही दिवसापूर्वी शहरातील सोन्या-चांदीचे दुकान फोडून अज्ञात चोरट्याने  लाखों रुपयांचा एवज चोरून नेला असून त्या त्या एकाही प्रकरणात पातूर पोलिसांनी अद्याप चोरट्यांचा शोधलावलेला दिसून येत नसल्याने या प्रकरणाचा नागरिकांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.