महिलेच्या तक्रारीवरुन लाचखोर लिपिक अटकेत

    13-Feb-2019
Total Views |
अकोला, 
 
शिर्ला ग्रापंच्या लिपिकाने घराची नोंदणी गाव नमुना आठ मध्ये करण्यासाठी एका महिलेला २ हजाराची लाच मागितली होती. ही लाच स्वीकारताना या लिपिकास लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने आज रंगेहाथ पकडले. पकडलेला आरोपी प्रमोद तुळशीराम उगले असे या लाचखोर कर्मचार्‍याचे नाव आहे.
 
पातूर येथील रहिवासी असलेल्या महिला तक्रारदाराने, आपले घर त्यांच्या मुलींच्या नावाने ग्रामपंचायत रेकॉर्डवर नोंद करण्यासाठी तक्रारदारला गेल्या महिन्याभरापासून विनंती करीत होती. मात्र लिपिक उगले हा महिलेचे घर मुलीच्या नावाने करण्यासाठी टाळाटाळ करीत होता. शेवटी तक्रारदाराने घराची नोंद करण्यासाठी काय करावे लागेल, अशी विचारणा केल्यावर, लिपिक प्रमोद उगले याने २ हजार रुपयांची लाच मागितली होती.
 
 
 
महिलेला सदर तक्रारदाराला लाचेची रक्कम द्यायची नसल्याने, तशी तक्रार अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. त्यावरून अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सर्व प्रकारच्या कायदेशीर बाबी तपासून, लिपिक प्रमोद उगले याने २ हजार रुपयांची लाच मागितली असल्याची खात्री झाल्याने, शिर्ला ग्रामपंचायतच्या हद्दीत सापळा रचून, प्रमोद उगलेला दोन हजाराची लाच घेताना रंगेहाथ अटक करून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.
 
उद्या गुरूवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.