लांब आणि मजबूत केसांसाठी....

    21-Feb-2019
Total Views |
प्रत्येकाला आपले केस मजबूत असले पाहिजे, असे वाटत असते. धूळ आणि निष्काळजीपणामुळे केस खराब होण्याची शक्यता जास्त असते. तसेच केसांना मजबूत बनविण्यासाठी आपण पार्लरमध्ये जाऊन ट्रिटमेंट करीत असतो. यामुळे केस खराब होऊ शकतात. तसेच विविध रसायनांचे वापर केसांवर करणे टाळावे. आरोग्याच्या समस्यांमुळे आणि पोषक घटकांच्या कमतरतेमुळे केस गळण्याच्या समस्यांचा सामना करावा लागतो. योग्य आहाराचे सेवन मजबूत केसांसाठी महत्त्वाचे आहे. पाले भाज्या आणि कडधान्य केसनासाठी फायद्याचे असून प्रोटीनयुक्त आहाराचे सेवन नियमित करावे.
बर्‍याचदा दूषित पर्यावरण आणि खराब जीवनशैली यांसारख्या कारणांमुळे केसांच्या वाढीसाठी आवश्यक असणार्‍या पोषक घटकांची कमतरता आढळून येते. परिणामी केसं गळतात िंकवा केस निर्जीव आणि कोरडे होतात. तसेच यामुळे केसांची वाढ खुंटते. या समस्येपासून सुटका करून घेण्यासाठी आपल्या आहारात काही बदल करणे आवश्यक असते. ज्यामुळे केसांच्या वाढिसोबतच केसांची चमक परत मिळविण्यातही मदत होते.
 
प्रोटीन
सुंदर आणि मजबूत केसांसाठी आहारात प्रोटीन असणे महत्त्वाचे आहे. केसांना तुटण्यापासून वाचविण्यासाठी प्रोटीनचा वापर करणे आवश्यक आहे. पार्लरमध्ये सुद्धा प्रोटीन ट्रिटमेंट केले जात असून काही वेळेनंतर केसांवर ही ट्रिटमेंट परत करावी लागते. प्रोटीनयुक्त अन्न जसे दूध, दही, ब्रॉकली आणि अंड्याचे नियमित आहारात समावेश करावे. केसांमध्ये असणारी पोषक घटकांची कमी पूर्ण करण्यासाठी प्रोटीन मदत करते. त्यामुळे आपल्या आहारामध्ये प्रोटीनयुक्त पदार्थांचा समावेश आव्यश्यक आहे. केसांना सुंदर आणि दाट करण्यासाठी बदाम आणि चीज सुद्धा उपयोगी आहे.

 
 
ओमेगा 3
प्रोटीनसह ओमेगा सुद्धा केसांसाठी महत्त्वाचे आहे. ओमेगा-3 फॅटी अॅसिड आरोग्यासाठी फायदेशीर आहे. ओमेगा- फॅटी अॅसिड प्रामुख्याने मासे, पालेभाज्या आणि ड्रायफ्रुट्समध्ये मिळतात. याव्यतिरिक्त माशांचे तेलही केसांसाठी फायदेशीर आहे. तसेच विविध तेलांमध्ये सुद्धा ओमेगा असते. ऑलिव्ह ऑईलमध्ये ओमेगा चे प्रमाण जास्त असून हे तेल हफ्त्यातून दोनदा लावून स्काल्पची मसाज करावे.
 
आयर्न
महिलांच्या शरीरामध्ये आयर्नची कमतरता झाल्यामुळे अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे शरीरासोबतच केसांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी आयर्नची कमतरता भरून काढणे अत्यंत आवश्यक असते. तसेच पालक, आयर्न, व्हिटॅमिन-ए, सी आणि प्रोटीनचा उत्तम स्त्रोत आहे. पालकमुळे केसांना चमक मिळते. यामध्ये ओमेगा-3 अॅसिड, मॅग्नेशिअम, कॅल्शिअम आणि आयर्न असते. यामुळे स्काल्प हेल्दी आणि केस सुंदर दिसण्यास मदत होते.
व्हिटॅमिन-डी
व्हिटॅमिन-डीचा उपयोग केल्याने केसांचे आरोग्य राखण्यासोबतच ते सुंदर, दाट आणि चमकदार होण्यास मदत होते. त्यामुळे व्हिटॅमिन-डीची कमतरता पूर्ण करण्यासाठी मशरूम िंकवा सॅल्मन माशांचे सेवन करणे फायदेशीर आहे.
मॅग्नेशिअम
लांब केसांसाठी आहारात मॅग्नेशिअमचा समावेश करणे आव्यश्यक आहे. डँड्रफमुळे केस गळण्याचे प्रमाण वाढते. हे टाळण्यासाठी मॅग्नेशियमचे तेल उत्तम आहे. स्काल्पवर डँड्रफचे थर जमल्याने केसांची वाढ होत नाही आणि केस गळण्याचे प्रमाण सुद्धा वाढते. त्यामुळे आहारामध्ये पालक, ब्राउन राइस, ड्रायफ्रुट्स इत्यादी पदार्थांचे समावेश करावे. िंझकमुळे केस दाट आणि मजबूत होण्यास मदत होते.