दिवाळीनंतर वन पर्यटनात होणार वाढ!

    21-Oct-2020
Total Views |

दिवाळीनंतर_1  H
 
-ऑनलाईन बुकिंगला झाला प्रारंभ
 
-कोरोना नियमानुसार मिळतोय् प्रवेश
 
 
नागपूर,
 
राज्यातील बहुतांश जंगल क्षेत्र आणि व्याघ्र प्रकल्प विदर्भातच आहेत. त्यामुळे वन पर्यटन आणि जंगल सफारीसाठी पर्यटक येथे अक्षरश: गर्दी करतात. परंतु यंदा कोरोनासारख्या महामारीने धुमाकुळ घातल्याने उन्हाळ्यापासूनच वन पर्यटन आणि जंगल सफारी बंद करण्यात आली. तब्बल सहा महिन्यांच्या कालावधीनंतर वनपर्यटन सुरू तर झाले, मात्र पर्यटकांचा हवा तसा प्रतिसाद अजून मिळालेला नाही. पण दिवाळीनंतर वन पर्यटनात निश्चित वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
 
पेंच व्याघ्र प्रकल्प, बोर व्याघ्र प्रकल्प आणि उमरेड-क?र्‍हांडलापवनी अभयारण्य येथे 1 ऑक्टोबरपासून पर्यटनास प्रारंभ केला जाणार आहे. जंगलातील ज्या रस्त्यांची स्थिती योग्य आहे तिथे सफारी सुरू करण्यात आली आहे. केवळ ऑफलाईन पद्धतीने सफारीचे बुकिंग सुरुवातीचे 15 दिवस पर्यटकांना करता आले. आता ऑनलाईन बुकिंगचीही प्रक्रिया सुरू झालेली आहे. मात्र असे असले तरी पाहिजे त्या प्रमाणात अर्थात मागील वर्षी प्रमाणे जसा पर्यटकांचा प्रतिसाद मिळाला, त्यापेक्षाही कमी प्रतिसाद यंदाच्या ऑक्टोबर महिन्यात मिळाला.
 
ही स्थिती सुधारण्याची लक्षणे नसली तरी दिवाळी झाल्यावर तसेच डिसेंबर- जानेवारी महिन्यात वनपर्यटनाकडे पर्यटकांचा कल वाढणार असल्याचा अंदाज वनकर्मचारी आणि ज्यांचा रोजगार वन पर्यटनाचे जाणकार व्यक्त करीत आहेत. नियमानुसार सुरू सफारी महाराष्ट्रात कोरोनाचा प्रकोप सर्वाधिक दिसून आला. परंतु मोकळिकीकरणाच्या प्रक्रियेत जेव्हापासून जंगल सफारी सुरू झाली, तेव्हापासूनच कोरोना नियमांचा कठोर अवलंब वनविभागाच्या वतीने करण्यात येणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या एकूण क्षमतेपैकी फक्त 50 टक्के पर्यटकांना प्रवेश देण्यात येतोय्.
 
तसेच एका खुल्या जिप्सीत 1 वाहनचालक, एक गाइड आणि चार पर्यटकांना परवानगी आहे. खाजगी गाड्यांच्या बाबतीत 50 टक्के पर्यटक संख्या गाडीनुसार निश्चित करण्यात आली आहे. तसेच सफारी दरम्यान सुरक्षित अंतराचा नियम पाळण्यावर भर देण्यात आला आहे. 10 वर्षांपेक्षा कमी आणि 65 वर्षांहून अधिक व्यक्तींना सध्या पर्यटनास परवानगी नाही. तसेच पर्यटन संकुलात देखील एकूण क्षमतेच्या 30 टक्क्यांपर्यंत निवासास परवानगी दिलेली आहे. पर्यटनास येणार्‍या प्रत्येकाची थर्मल यंत्राद्वारे तपासणी देखील करण्यात येत असल्याचे पेंच व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रसंचालक डॉ. रविकिरण गोवेकर यांनी सांगितले.