खासदार-आमदार पती-पत्नींच्या प्रतिमांना तुडवले

    21-Oct-2020
Total Views |

खासदार_1  H x W

 
 
 
 
- शिवसेनचे राजकमल चौकात आंदोलन 
 
अमरावती,
 
धारणीत आदिवासी युवतीवर झालेल्या बलात्काराच्या घटनेच्या व सतत मुख्यमंत्र्यावर टीका करण्याच्या निषेधार्थ शिवसेना अमरावती महानगरच्या कार्यकर्त्यांनी खासदार, आमदार या पती-पत्नी जोडीच्या प्रतिमेला चपलांनी झोडपून पायाखाली तुडवले. तसेच खासदार आमदार जोडीने मुख्यमंत्र्यावर टीका न करता जिल्ह्यातील महिलांच्या सुरक्षेवर लक्ष द्यावे, असा सल्लाही दिला.
 
सतत महाराष्ट्राचेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आपल्या मेळघाट ‘पिकनिक’ दौर्‍यावर असलेले खासदार आमदार ‘मुख्यमंत्री मातोश्री बाहेर पडा’ अशी टीका करीत असतात. परंतु आपल्या मतदार संघात कोविड सेंटरमध्ये महिलेवर वाईट वेळ येते. जिल्ह्यातील मेळघाटमध्ये धारणी गावात शक्रवारी एका युवतीवर शेतात नेऊन बलात्कार कला जातो आणि अमरावती जिल्ह्यातील महिला खासदार तिथे साधी भेटसुद्धा देत नाही व त्यावर एक चकार शब्दसुद्धा बोलत नाही, उलट मेळघाट पिकनिक दौर्‍यावर एस. टी. बसमध्ये ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ सिनेम्यासारखे बसमधून नौटंकी करून कोरोनाविरुद्ध ताकदीने लढत असलेल्या मुख्यमंत्र्यावर टीका करतात. त्याच्या निषेधार्थ शिवसेना अमरावती महानगरच्या वतीने महानगर प्रमुख पराग गुडधे यांच्या नेतृत्वात राजकमल चौकात जोरदार आंदोलन करण्यात आले. यावेळी खासदार व आमदार यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. जय भवानी, जय शिवाजी सारख्या नार्‍यांनी शिवसैनिकांनी परिसर दणाणून सोडला. खासदार, आमदार यांनी मतदार संघात लक्ष द्यावे. विनाकारण मुख्यमंत्र्यावर टीका करणे तात्काळ थांबवावे व जिल्ह्यात महिलेच्या सुरक्षतेवर लक्ष द्यावे, विकास कामावर लक्ष द्यावे, विनाकारणच्या भानगडीत पडू नये, असा इशारा शिवसेनेकडून देण्यात आला. आंदोलनात असंख्य शिवसैनिक सहभागी झाले होते.