ढाणकी नगर पंचायत सभापतीपदांवर वंचितसह काँग्रेसचे वर्चस्व

भाजपाचा टेकूने लागली लॉटरी

    31-Jan-2023
Total Views |
तभा वृत्तसेवा
ढाणकी,
ढाणकी नगर पंचायतच्या (Dhanki Nagar Panchayat) विषय समिती सभापतीपदांसाठी झालेल्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी व काँग्रेसने पाचही विषय समिती सभापतीपदे पटकावली. पूर्ण बहुमतात असलेल्या भाजपाच्या टेकूने काँग्रेसच्या तीन व वंचितच्या दोन नगरसेवकांच्या गळ्यात सभापतीपद सहजपणे येऊन पडले. मंगळवार, 31 जानेवारी रोजी नपं सभागृहात झालेल्या निवडणूक प्रक्रियेसाठी विशेष सभा पार पडली.
 
Dhanki Nagar Panchayat
 
त्यामध्ये नियोजन आणि (Dhanki Nagar Panchayat) विकास सभापतीपदी नपं उपाध्यक्ष शेख जहीर, महिला व बालकल्याण सभापतीपदी शायदा शेख मिरांजी, बांधकाम सभापतीपदी काँग्रेसचे शंकर ताटीकुंडलवार, स्वच्छता व सार्वजनिक आरोग्य सभापतीपदी वंचितच्या बशनूर सय्यद खलील, पाणीपुरवठा सभापतीपदी वंचितचे संबोधी गायकवाड यांची वर्णी लागली.
 
 
या (Dhanki Nagar Panchayat) निवडणुकीत अध्यासी अधिकारी म्हणून उमरखेडचे उपविभागीय अधिकारी डॉ. व्यंकट राठोड, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी महेश जामनोर, नपं लिपिक राजू दवणे यांनी काम पाहिले. या सभेला निर्वाचित 17 व नामनिर्देशित 2 असे एकूण 19 सदस्य उपस्थित होते. बिटरगाव पोलिस ठाणेदार प्रताप भोस यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. सर्व नवनिर्वाचित सभापतींचा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बाळासाहेब चंद्रे यांनी सत्कार केला.