नेत्रशस्त्रक्रिया विभाग राज्यात अव्वल

- नेत्रतज्ज्ञ डॉ. रवी शिंदे यांना जिल्हाधिकारी याच्या हस्ते प्रशस्तीपत्र

    31-Jan-2023
Total Views |
बुलडाणा, 
येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील नेत्रतज्ञ डाँ. रवी शिंदे यांनी कोरोना काळात असंख्य रुग्णाच्या नेत्र शस्त्रक्रिया (Ophthalmology) केल्या. मागील सहा वर्षात हजारो नेत्र शस्त्रक्रिया यशस्वी करून असंख्य रुग्णाच्या डोळ्यांना नव संजीवनी देण्याचे कार्य केले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेवुन त्यांना प्रजासत्तक दिनी जिल्हाधिकारी तुम्मोड यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देवुन गौरविण्यात आले आहे.
  
Ophthalmology
 
येथील प्रसिध्द नेत्र तज्ञ डॉ. रवि शिंदे यांनी आतापर्यत केलेल्या हजारो शस्त्रक्रिया यशस्वी ठरल्या आहेत. वास्तविक पाहता सरकारी दवाखान्यात मोतिबिंदू तसेच अनेक डोळ्यांच्या शसक्रिया मोफत केल्या जातात. हे अनेकांना माहित नसते. त्यामुळे असंख्य रुग्ण खासगी दवाखान्यात जावुन हजारो रुपये खर्च करून डोळयाची शस्त्रक्रीया (Ophthalmology) करतात. तसे पाहता मोतिबिंदू हा आजार सर्वाधीक वयोवृद्ध नागरीकामध्ये आढळून येतो. जिल्हा शल्यचिकीत्सक तडस यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. शिंदे यांनी हजारो रुग्णाच्या डोळयाची यशस्वी शस्त्रक्रिया केली. त्यामुळे बुलडाण्याचा नेत्र शस्त्रक्रिया विभाग राज्यात अव्वल आला आहे. या बद्दल प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हाधिकारी डाँ.एच.पि.तुम्मोड यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयाचे नेत्रतज्ज्ञ डॉ. रवी शिंदे यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित केले.
 
 
यावेळी आमदार संजय गायकवाड, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, जिल्हा पोलिस अधीक्षक सारंग आवाड, अतिरिक्त जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते, उपजिल्हा निवडणूक अधिकारी गौरवी सावंत, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधीक्षक शामला खोत, अतिरिक्त पोलिस अधीक्षक बाबुराव महामुनी, पोलिस उपअधीक्षक गिरीश ताथोड यांच्यासह विरमाता, विरपिता, विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.