मनपाद्वारे अतिक्रमणावर निष्कासनाची कारवाई

- अनधिकृत होर्डिंग्जही काढले

    31-Jan-2023
Total Views |
अकोला, 
Encroachment : अकोला महानगरपालिका क्षेत्रातील उत्तर झोन अंतर्गत साधना चौक, भीम चौक तसेच आकोट फैल आणि अकोट रोड मुख्य रस्त्यावरील अतिक्रमित हातगाड्या, ठेले, दुकानांसमोरील ओटे, शेड तसेच कच्च्या व पक्क्या स्वरूपाच्या अतिक्रमणावर मनपा अतिक्रमण विभागाद्वारे निष्कासनाची कारवाई करण्यात आली आहे. याचसोबत शहरातील विद्युत खांबावरील अनधिकृत होर्डिंग्ज काढण्यात आले.
 
Encroachment
 
या कारवाईत अतिक्रमण विभागाचे सहायक अतिक्रमण (Encroachment) अधिकारी प्रवीण मिश्रा, चंद्रशेखर इंगळे, सुरक्षा रक्षक रूपेश इंगळे, वैभव कवाडे, सै. रफीक, योगेश कंचनपुरे, स्वप्नील शिंदखेडकर, गुलाम मुस्तफा, अब्दुल राजीक, शोभा इंगळे, सविता सगळे, स्वप्नील पवार, धिरज पवार, पवन चव्हाण, सोनु गायकवाड, मनपा विद्युत विभागाचे विजय यादव, महेंद्र रोकडे, हरिहर घोडके, मनोहर मसके, गजानन मेंगे, गजानन बोरडे व अभिकर्ताचे अजिंक्य खाडे, नागेश हेरोळे, विशाल खंडारे, हरिश बोंडे, सागर भागवत, योगेश मुळे, प्रशांत झाडे, सुरज लोंढ, नितिन सोनोने आदी कर्मचार्‍यांची उपस्थिती होती.