जि.प. निलडोह शाळेत धुमधडाक्यात वार्षिक स्नेहसंमेलन साजरे

    31-Jan-2023
Total Views |
नागपूर,
निलडोह ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या (J.P. Nildoh School) जिल्हा परिषदेच्या शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गाणे, नृत्य, सांस्कृतिक व जनजागृतीपर नाट्य सादर केले.
 
J.P. Nildoh School
 
मोठ्या उत्साहात संपन्न झालेल्या या (J.P. Nildoh School) कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून निलडोहच्या सरपंच वनिता गळमळे, उपसरपंच मनोज सुभेकर, ग्रामपंचायत सदस्य प्रदीप फलके, निलेश वर्मा, उषा चौधरी, रेखा कुडे, मुख्याध्यापिका ढोमणे, शाळा व्यवस्थापन समितीच्या नाकाडे मॅडम, मुख्याध्यापिका आशा नारनवरे, मीनाक्षी कदम, प्रशांत डोबले, डॉ.संध्या पवार, मंजुलता मोगलेवार, मीनाक्षी कन्हेरे, प्रणिता भैस्वार, सारिका वरठी, संध्या पारखंडे, वर्षा उईके, नलिनी चक्रे, सामाजिक कार्यकर्ते अशोक वैद्य, विठ्ठल हुलके, विद्यार्थी व पालकवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
 
- सौजन्य : डॉ. संध्या पवार, संपर्क मित्र