पत्रकाराला अश्लील शिवीगाळ, जिवे मारण्याची धमकी

राळेगाव तालुका पत्रकार संघाकडून निषेध

    31-Jan-2023
Total Views |
तभा वृत्तसेवा
राळेगाव, 
कळंब येथील एका दैनिकाचे तालुका प्रतिनिधी Journalist Union आणि तरुण भारतचे वितरक शेषराव मोरे यांनी आजच्या अंकात नगर पंचायत विरोधात बातमी प्रकाशित केली. त्यामुळे नगर पंचायत अध्यक्षांचे चिरंजीव सरोश उर्फ सोनू सिद्दीकी याने चिडून पत्रकार शेषराव मोरे यांना अश्लील शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी देऊन दुचाकीही अंगावर घातली. हा प्रकार अतिशय निंदनीय व निषेधार्ह आहे. याचा तीव्र निषेध, पी. एल. शिरसाटप्रणित यवतमाळ जिल्हा ग्रामीण पत्रकार संघ शाखा राळेगाव तालुका पत्रकार संघाच्या वतीने विशेष सभेत करण्यात आला आहे.
 
Journalist Union
 
दोषींवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी व Journalist Union असा प्रकार पुन्हा होऊ नये याची खबरदारी प्रशासनाने घ्यावी, अशी लेखी तक्रार सोमवार, 30 जानेवारीला तहसीलदार डॉ. रवींद्र कानडजे व राळेगाव पोलिस ठाणेदार संजय चौबे यांना देण्यात आले आहे. यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष महेश शेंडे, सचिव राष्ट्रपाल भोंगाडे, उपाध्यक्ष रामू भोयर, मनोहर बोभाटे, प्रकाश मेहता, राजेश काळे, मोहन देशमुख, फिरोज लाखाणी, प्रमोद गवारकर, मंगेश राऊत, महेश भोयर, गुड्डू मेहता, सचिन राडे, शंकर वरघट, विनोद चिरडे, विशाल मासुरकर, संजय दुरबुडे, दीपक पवार, गजानन ठुणे, अरविंद तेलंगे, रणजित परचाके, दीपक वरटकर प्रामु‘याने उपस्थित होते.