स्व. शशिकला आगाशे सृजन वार्षिक अकांचे प्रकाशन

- पुरस्कार वितरण

    31-Jan-2023
Total Views |
बुलढाणा, 
भारत विद्यालयाच्या संस्थापिका, तसेच कलाप्रेमी मुख्याध्यापिका स्व.शशीकला आगाशे यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांच्या सृजन वार्षिकांकाचे (Annual Book) प्रकाशन मुलींच्या क्रिकेट अकॅडमीचे उदघाटन व विविध पुरस्कारांचे वितरण भारत विद्यालय सोसायटीच्या अध्यक्षा डॉ. सीमा आगाशे व उपस्थित मान्यवरांचे हस्ते करण्यात आले.
 
Annual Book
 
प्रसिद्ध साहित्यिक व भारत विद्यालयाचे ग्रंथपाल स्व.नरेंद्र लांजेवार यांच्या प्रेरणेने सुरू झालेल्या सृजन वार्षिकांकाचे यावर्षी 24 वे प्रकाशन होते. या वार्षिकांकामध्ये विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या कविता,लेख, चित्र, व्यंगचित्र, विनोद, डिझाईन सोबत विविध परीक्षांमधील यश,भारत विद्यालय मंत्रिमंडळाने वर्षभर राबविलेले उपक्रम,वार्षिक अहवाल यांना स्थान देण्यात आले आहे .या वार्षिकांकाचे संपादन शिक्षक मनोज बैरागी यांनी केले आहे.
 
 
याप्रसंगी विद्यार्थ्यांना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.यामध्ये उत्कृष्ठ विद्यार्थी, उत्कर्ष पुरस्कार,ऑल राऊंडर विद्यार्थी, गरीब व होतकरू विद्यार्थी, स्त्री शक्ती पुरस्कार तसेच स्व. हर्षवर्धन आगाशे आऊटस्टँडिंग लीडरशिप अवॉर्ड अशा विविध पुरस्काराचे वितरण प्रसिद्ध संगीतकार देवदत्त मनीषा बाजी, प्रसिद्ध गिटार वादक सृजन कुलकर्णी,प्रसिद्ध गायिका नीती हेगडे, प्रसिद्ध तबलावादक नागेश भोसेकर, अमोल जूनगडे, निकिता साळुंखे, प्रतीक फरगडे,गजानन कुलकर्णी, श्रीकांत जतकर यांच्या हस्ते करण्यात आले. बक्षीस वितरण कार्यक्रमाचे संचालन शिक्षक जे.एस.शेख यांनी केले.
 
 
भारत विद्यालयाचे शिक्षक प्रा. संजय देवल यांनी स्थापन केलेल्या भारत विद्यालय क्रिकेट अकॅडमीच्या रौप्य महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने मुलींच्या क्रिकेट अकॅडमी चे उदघाटन प्रसिद्ध क्रिकेटपटू रणजी खेळाडू व भारत विद्यालयाचे माजी विद्यार्थी अमोल जूनगडे व निकिता साळुंखे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्रसिद्ध छायाचित्रकार रविकिरण टाकळकर व वार्षिकांकाची उत्कृष्ट छपाई केल्याबद्दल त्रिमूर्ती प्रिंटर्स चे नारायण भाकडे व भागिले यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभारी मुख्याध्यापक समाधान भटकर यांनी केले तर पाहुण्यांचा ओघवत्या शैलीत परिचय प्रा. विनोद देशमुख व प्रा. प्रेषित सिद्ध भट्टी यांनी केले.