टिप्परच्या धडकेत चिमुकला ठार

- मुंडीपार येथील घटना

    31-Jan-2023
Total Views |
तभा वृत्तसेवा 
गोंदिया, 
Accident : बांधकाम साहित्य घेऊन जाणाऱ्या टिप्पर ने धडक दिल्याने अंगणात खेळत असलेला चिमुकला जाग्गीच ठार झाल्याची घटना आज मंगळवार ३१ जानेवारी रोजी संध्याकाळी ४ वाजताच्या सुमारास तालुक्यातील मुंडीपार (खुर्द) येथे घडली. नक्ष उर्फ तनुज छनिलाल गौतम (६) असे चिमुकल्याचे नाव आहे. तनुज आपल्या घरासमोरील अंगणात खेळत असताना मुंडीपार - कामठा मार्गावरील रस्ता बांधकामाचे साहित्य घेऊन जाणाऱ्या टिप्पर क्रमांक एमएच ३५ के ५०८० च्या चालकाने वाहन निष्काळजीपणाने चालवून चिमुकल्यास जोरदार धडक दिली. यात तनुजचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेची गोंदिया ग्रामीण पोलिसांनी केली असून पुढील तपास पोलिस निरीक्षक अजय भुसारी करीत आहेत.
 
Accident