स्माईल ट्री फाउंडेशन संस्थेतर्फे 'स्त्री शक्तीचा सन्मान'

    31-Jan-2023
Total Views |
नागपूर, 
'स्माईल ट्री फाउंडेशन' (Smile Tree Foundation) नरेंद्र नगर, नागपूर, या संस्थेतर्फे दिनांक २८ जानेवारी २०२३ रोजी मकर संक्रांति निमित्त हळदी कुंकाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमामध्ये 'स्त्री हुंकार महिला मंडळाच्या' अध्यक्षा सौ. देवयानी कळमकर यांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
 
Smile Tree Foundation
 
मुख्यतः हळदीकुंकू हा सौभाग्यवती स्त्रियांचा सण / कार्यक्रम आहे. पण या कार्यक्रमामध्ये विशेषतः विधवा महिलांना आमंत्रित करण्यात आले होते, जेणेकरून अशा महिलांना समाजाच्या मूळ प्रवाहात आणणे, त्यांच्यासोबतही सन्मानाने वागणे हा संस्थेचा त्यामागील मूळ उद्देश होता. स्माईल ट्री फाउंडेशन या संस्थेने या कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजामध्ये नवीन पायंडा पाडण्याचे कार्य केले हा अतिशय स्तुत्य असा उपक्रम होता. याप्रसंगी मंचावर संस्थेच्या अध्यक्षा, स्वाती वंजारी, देवयानी कळमकर, वैदेही वैद्य उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे संचालन अर्चना पांडे यांनी केले. कार्यक्रमाला शेकडो महिला उपस्थित होत्या.
 
         सौजन्य : आनंद कळमकर (संपर्क मित्र)