गोंदियात आजपासून राज्य बास्केटबॉल, रोलबॉल स्पर्धा

- आठ विभागातील 48 संघ होणार सहभागी

    31-Jan-2023
Total Views |
तभा वृत्तसेवा 
गोंदिया, 
जिल्हा क्रीडा संकुलावर पहिल्यांदाच राज्यस्तरीय शालेय बास्केटबॉल, रोलबॉल स्पर्धा (Tournament) आयोजन 1 फेब्रुवारीपासून सुरु होत आहेत. या स्पर्धेत राज्यातील 8 विभागातील 48 संघ सहभागी होणार आहेत.
 
Tournament
 
क्रीडा व युवक सेवा संचालनालयामार्फत शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाच्या वतीने जिल्हा अधिकारी, जिल्हा क्रीडा परिषदेच्या संयुक्त विद्यमाने या राज्यस्तरीय शालेय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत राज्यातील 8 विभागातील 48 संघ सहभागी होणार आहेत. यात बॉस्केटबॉल स्पर्धेत 14 वर्ष वयोगटातील 176 मुले व मुली तसेच व रोलबॉल स्पर्धेत 17 व 19 वर्ष वयोगटातील 448 मुले व मुली असे 624 खेळाडू, त्यांचे संघ व्यवस्थापक आणि मार्गदर्शक सहभागी होणार आहेत. जिल्ह्यातील खेळाडू, क्रीडाप्रेमी व नागरिकांनी या स्पर्धेचा आनंद घ्यावा. असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी घनश्याम राठोड यांनी केले आहे.