यवतमाळात विदर्भस्तर शरीर सौष्ठव व शिवश्री स्पर्धा

अविनाश लोखंडे : शिवदासराव लोखंडे यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ आयोजन

    31-Jan-2023
Total Views |
तभा वृत्तसेवा
यवतमाळ, 
धकाधकीच्या जीवनशैलीत Shivshree competition तरुणांनी व्यायामाकडे वळून व्यसनांपासून दूर राहावे आणि उत्तम आरोग्य राखावे हा संदेश देण्यासाठी यवतमाळ येथे गुरुवार, 2 फेब्रुवारी रोजी विदर्भस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा शिवश्री 2023 चे आयोजन करण्यात आले आहे. स्थानिक बालाजी सोसायटीतील वीर सावरकर मैदानावर संध्याकाळी 5.30 वाजता ही स्पर्धा होणार असल्याचे अविनाश लोखंडे यांनी सांगितले.
 
Shivshree competition
 
मंगळवार, Shivshree competition 31 जानेवारी रोजी प्रा. अनंत पांडे, धनंजय लोखंडे, सचिन जिरापुरे, प्रशांत जिरापुरे यांच्या उपस्थितीत झालेल्या पत्रपरिषदेत लोखंडे बोलत होते. ते पुढे म्हणाले, विदर्भ बॉडी बिल्डर्स अ‍ॅन्ड फिटनेस असोसिएशनच्या मान्यतेने व जिल्हा असोसिएशनच्या सहकार्याने शिव आणि शिवनेरी मसल्स अ‍ॅन्ड फिटनेस जिम मित्रपरिवारातर्फे शिवदास लोखंडे यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ या शरीर सौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
 
 
या स्पर्धेत 15 विजेत्या स्पर्धकांना रोख बक्षीस देऊन गौरविण्यात Shivshree competition येणार आहे. विदर्भ टॉप टेन गटात 31 हजार रुपयांचे पहिले बक्षीस स्व. डॉ. शितल जिरापुरे स्मृतीप्रीत्यर्थ दिले जाणार आहे. 25 हजार रुपयांचे दुसरे बक्षीस चंद्रशेखर देशमुख स्मृतीप्रीत्यर्थ, 21 हजार रुपयांचे तिसरे बक्षीस सुरेश भुसारी स्मृतीप्रीत्यर्थ, 15 हजार रुपयांचे चौथे बक्षीस आकाराम पाचपोर स्मृतीप्रीत्यर्थ दिले जाणार आहे. प्रत्येकी 11 हजार रुपयांचे पाचवे आणि सहावे बक्षीस विजया घुईखेडकर आणि बाळासाहेब पांडे स्मृतीप्रीत्यर्थ, 7 हजार रुपयांचे सातवे आणि आठवे बक्षीस सुधाकर धलवार आणि निर्मल दरेकर स्मृतीप्रीत्यर्थ, 5 हजार रुपयांचे नववे आणि दहावे बक्षीस विजय भुरचंडी आणि पंचफुला शेलार यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ दिले जाणार आहे.
 
 
जिल्हास्तर टॉप फाईव्ह शरीर सौष्ठव गटात Shivshree competition 15 हजार रुपयांचे पहिले बक्षीस हरिदास भागवत स्मृतीप्रीत्यर्थ, 11 हजार रुपयांचे दुसरे बक्षीस रामराव वासेकर स्मृतीप्रीत्यर्थ, 7 हजार रुपयांचे तिसरे बक्षीस दामोधर खरात स्मृतीप्रीत्यर्थ, 5 हजार रुपयांचे चौथे व 3 हजार रुपयांचे पाचवे बक्षीस पांडूरंग पवार स्मृतीप्रीत्यर्थ देण्यात येणार आहे. उत्कृष्ट शरीर सौष्ठवपटूसाठी शिवश्री 2023 मानाची गदा आकर्षण आहे. ÷विविध पोझरमध्ये उत्कृष्ट प्रदर्शन करणार्‍या स्पर्धकास 7 हजार रुपयांचा आणि कमी कालावधीत शरीर विकसित करणार्‍या विजेत्या स्पर्धकास 7 हजार रुपयांचा बेस्ट इम्प्रुव्हड पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.
 
 
या स्पर्धेत संपूर्ण विदर्भातील Shivshree competition शरीर सौष्ठवपटू सहभागी होणार आहेत. कोरोनानंतर प्रथमच अशी स्पर्धा यवतमाळात होत असल्याने तरुणांमध्ये स्पर्धेबाबत उत्सुकता आहे. स्पर्धेसाठी आनंद भुसारी, धनंजय लोखंडे, सचिन भेंडे, निखिल धलवार यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.