ट्रकने चिरडल्याने महिलेचा मृत्यू

    31-Jan-2023
Total Views |
मालेगाव, 
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६१ वर मेडशी येथे ३० जानेवारी रोजी ट्रकने चिरडल्याने महिलेचा घटनास्थळीच मृत्यू (Woman died) झाल्याची घटना घडली आहे.
 
Woman died
 
मेडशी येथील आरोग्य वर्धिनीमध्ये कार्यरत परिचारिका शीला दिलीप कांबळे (वय ५४) रा. घोडमोड किन्ही ह्या ३० जानेवारी रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास मेडशी येथील बँकेतून काम आटोपून महामार्गावरील आरोग्य वर्धिनीकडे पायी चालत जात असताना पाठीमागून पातुरकडून भरधाव वेगाने येत असलेल्या ट्रक क्रमांक एमपी ०९ एचजी ६९६७ ने चिरडल्यामूळे घटनास्थळीच शीला कांबळे यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच मेडशी पोलिस चौकीत तैनात पोहेकॉ गजानन पांचाळ, पोकॉ ज्ञानेश्वर सानप, मालेगाव पोस्टेचे पोउपनि गजानन चौधरी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा केल्यानंतर मृतदेह मालेगावच्या ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवून अपघातास कारणीभूत ट्रक मालेगाव पोलिस स्टेशन मध्ये आणून अपघातामूळे अवरूध्द झालेली वाहतूक सुरळीत केली. घटनेचा तपास ठाणेदार दत्तात्रय आव्हाळे यांचे मार्गदर्शनात पोहेकॉ गजानन पांचाळ करीत आहेत.