एक हजाराची लाच घेतांना तलाठ्याला अटक !

    31-Jan-2023
Total Views |
वाशीम,  
रिसोड तालुक्यातील  (bribe) येवता येथील तलाठी संतोष परशराम राठोड (वय ५४) यांनी फेरफार देण्यासाठी १ हजार रुपयाची लाच मागीतल्या प्रकरणी लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहाथ कारवाई केली. यामुळे महसूल प्रशासनात एकच खळबळ उडाली. याबाबत सविस्तर असे की, तक्रारदार पुरुष यांनी दिलेल्या तक्रारीनुसार तक्रारदार यांचे शेतात असलेल्या बोरवेल (विंधन विहिर) ची फेरफार घेऊन त्याची प्रत देणे करीता तलाठी संतोष राठोड यांनी १ हजार रुपये लाचेची मागणी केली. त्यानुसार तक्रारदार यांनी लाचलुचपत विभागाकडे त्याबाबत तक्रार केली. त्यावरुन लाचलुचपत विभागच्या पथकाने ७ जानेवारी रोजी पडताळणी केली असता त्यात लाच मागीतल्याचे सिद्ध झाले, त्यावरुन आरोपीविरुद्ध कारवाई करण्यात आली.
 
 

rtrtrtrt 
सदरची कारवाई एसीबीचे पोलिस अधीक्षक  (bribe) मारोती जगताप, अरुण सावंत, अपर पोलिस अधीक्षक देविदास घेवारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधीक्षक गजान शेळके, पोनि अफूने, पोहवा आशिफ शेख, विनोद अवगळे, राहुल व्यवहारे, रवी घरात, दुर्गादास जाधव, बेलोकर, नितीन टवलारकर, विनोद मार्कण्ड, योगेश खोटे, उज्वल देशमुख, चालक नावेद शेख आदींनी केली.