तायक्वांदो स्पर्धेत युगा मेश्रामला कांस्यपदक !

    31-Jan-2023
Total Views |
तभा वृत्तसेवा
देवरी,
तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रद्वारे  (bronze in taekwondo) जळगाव येथे आयोजित 32 व्या महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद ज्युनियर तायक्वांदो स्पर्धेत येथील युगा राकेशकुमार मेश्रामने 62 किलो गटात कांस्यपदक पटकाविले.
 

ererere 
 
 
जळगाव येथील शिवछत्रपती शिवाजी संकुलात (bronze in taekwondo)  या स्पर्धेचे आयोजन 26 ते 28 जानेवारी 2023 या कालावधीत आयोजन करण्यात आले होते. यात जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करताना युगा राकेशकुमार मेश्रामने कांस्यपदक पटकावले. तसेच जिल्हा संघातील अनुराधा जुमनाके, सिमरन राऊत, एंजल पटले, श्रृती श्रीरंगपुरे, सिमरन फुले, माधुरी थेर, संकेत होडकर, कुंजन डोये, ख्रिस मेश्राम यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. स्वप्नील ठाकरे, ओमेश्वर तांडेकर यांनी संघ प्रशिक्षक म्हणून काम पाहिले. युगा मेश्रामचे पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार विजेते प्रवीण बोरसे, मिलिंद पठारे, गोंदिया जिल्हा तायक्वांदो संघटनेचे कार्याध्यक्ष डॉ खगिंदर येडे, उपाध्यक्ष शिखा पिपलेवार, सचिव दुलीचंद मेश्राम, तायक्वांदो स्पोर्ट्स अकादमी देवरीचे सचिव अमित मेश्राम, सदस्य सचिन बावनकर, धीरज रामटके, दक्ष गवते, वैष्णवी मडावी, स्मिता तुलावी आदींनी अभिनंदन केले.