येरकड पोमकेत रंगल्या दिव्यांगांच्या स्पर्धा !

    31-Jan-2023
Total Views |
धानोरा, 
पोलिस मदत केंद्र येरकड व दिव्यांग  (competition of handicaps) संघटना धानोरा यांच्या सहकार्याने दिव्यांगांसाठी येरकड येथील पोलिस मदत केंद्रात दिव्यांग मेळावा व सहाय्यक उपकरणे मोफत वाटप शिबिराचे आयोजन 25 जानेवारीला करण्यात आले होते. विशेष म्हणजे, यावेळी दिव्यांगांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
 

o8yhohohjn 
 
पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अप्पर पोलिस अधीक्षक  (competition of handicaps)  कुमार चिंता, अप्पर पोलिस अधीक्षक अनुज तारे व धानोराचे उपविभागीय पोलिस अधिकारी स्वप्नील जाधव, कारवाफाचे उपविभागीय पोलिस अधिकारी मयूर भुजबळ यांच्या मार्गदर्शनात दिव्यांग व्यक्तींना गरजेनुसार साहित्य वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यामध्ये गरजेनुसार पाच दिव्यांगांना विविध साहित्याचे वाटप करण्यात आले. मेळाव्यात दिव्यांगांसाठी 50 मीटर धावणे, रस्सीखेच व संगीतखुर्ची अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या. स्पर्धेत सहभाग घेणा-या दिव्यांग व्यक्तींना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी येरकडचे सरपंच वासुदेव उसेंडी होते. प्रमुख अतिथी म्हणून ग्रामविकास अधिकारी जयंत मेश्राम, दिव्यांग संघटनेचे तालुकाध्यक्ष प्रकाश मारबते, अतुल शिंपी आदी उपस्थित होते. प्रभारी अधिकारी आकाश ठाकरे यांनी प्रस्तावना सादर करुन मार्गदर्शन केले. संचालन पोलिस शिपाई अरुण आघाव यांनी तर आभार पोलिस उपनिरीक्षक कैलास माळी यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पोलिस उपनिरीक्षक भागवत यांच्यासह जिल्हा पोलिस अंमलदार व एसआरपीएफ अंमलदारांनी सहकार्य केले. या मेळाव्याला येरकड भागातील 25 दिव्यांग व इतर नागरिक उपस्थित होते.
 
गडचिरोली होणार दिव्यांगांचा महामेळावा!
शिबिरात प्रत्येक दिव्यांगाला सक्षम बनविण्यासाठी विविध शासकीय योजनांची  (competition of handicaps)  माहिती देण्यात आली. तसेच परिसरातील दिव्यांग व्यक्तींच्या अडचणींचे निराकरण करण्याचे आश्‍वासन देण्यात आले. पोलिस दल गडचिरोलीतर्फे आगामी काळात गडचिरोली येथे दिव्यांग महामेळावा आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. दिव्यांगांसाठी शासनाद्वारे सुरु असलेल्या विविध योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली. अलीकडे शासनाच्या वतीने दिव्यांगांच्या विकासासाठी विविध योजना प्रभावीपणे राबविल्या जात आहेत.