बी. बी. सपकाळ यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर

    31-Jan-2023
Total Views |
मंगरुळनाक्ष, 
वसंतराव नाईक कला व अमरसिंग नाईक  (dr. babasaheb ambedkar international award) वाणिज्य महाविद्यालय येथील माजी प्राचार्य बी. बी. सपकाळ यांना जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळाच्या वतीने दिला जाणारा आंतरराष्ट्रीय स्तरावरील २०२३ चा डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
 

ERERER 
 
 
मलेशियाची राजधानी क्वालालांपुर येथे ४,५ फेब्रुवारी  (dr. babasaheb ambedkar international award)   रोजी होणार्‍या दुसर्‍या आंबेडकरवादी साहित्य संमेलनामध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार प्रदान केल्या जाणार आहे. यापूर्वी देखील प्राचार्य सपकाळ यांना साहित्य क्षेत्रातील भारतीय दलित साहित्य अकादमी नवी दिल्ली यांच्या वतीने सुद्धा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तसेच राष्ट्रीय जनसेवा लोक गौरव पुरस्कार मुंबई, महाकवी वामनदादा कर्डक राज्यस्तरीय आदर्श पुरस्कार यांच्यासह विविध पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. तसेच सामाजिक व शैक्षणिक कार्याबद्दल तालुक्यामध्ये  त्यांचे खूप मोठे योगदान लाभलेले आहे. आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल प्राचार्य सपकाळ यांचे विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते अभिनंदन व कौतुक करण्यात येत आहे.