रस्त्यावर पाणी टाकून धुळीपासून बचाव करण्याची नामुष्की !

    31-Jan-2023
Total Views |
कोरची, 
शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी  (election of teachers constituency) लावलेल्या पेंडालसमोर स्वःखर्चाने पाणी टाकून धुळीपासून बचाव करण्याची नामुष्की राजकीय पदाधिकार्‍यांवर आली.
 

ererere 
 
 
30 जानेवारीला शिक्षक मतदार संघाची निवडणूक (election of teachers constituency)  पार पडली. यासाठी कोरची पासून एक किमी अंतरावरील भिमपूरकडे जाणार्‍या रस्त्यावर तहसील कार्यालय असून येथे निवडणूक केंद्र देण्यात आले होते. तालुक्यातील विविध शाळांमधून आलेल्या मतदार शिक्षकांना विसावा घेण्यासाठी भाजपा, काँग्रेस, शिवसेना, आम आदमी पार्टी आणि अपक्ष उमेदवारांनी रस्त्याच्या कडेला पेंडाल लावून चहापाण्याची व्यवस्था केली होती. परंतु या मार्गावर धुळीचे साम्राज्य असून येथील राजकीय पुढार्‍यांचा एका दिवसातच या रस्त्यावरील धुळीने जीव गुदमरला आणि पेंडालसमोर स्वःखर्चाने पाणी टाकून धुळीपासून बचाव केला.
 
कोरची- भिमपूर  (election of teachers constituency) या 4 किमी रस्त्याचे काम मागील दीड वर्षापासून सुरू आहे. या रस्त्याने छत्तीसगडमधुन महाराष्ट्र, आंध्रप्रदेश राज्यात मोठ्या प्रमाणात ट्रक जातात. त्यामुळे गिट्टी पुर्णतः उखडली असल्याने या मार्गावरुन जेव्हा ट्रक जातात, तेव्हा धुळीचे ढग सभोवताली पसरतात. या रस्त्याच्या कडेला पहील्या वर्गापासून बारावी पर्यंतची शासकीय आश्रमशाळा आहे. शासकीय मुलींचे व मुलांचे वसतिगृह, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, तहसील कार्यालय, पंचायत समिती कार्यालय, लोकांची वस्ती आणि ग्रामीण रुग्णालय आहे. धुळीचे कण नाक, तोंडावाटे थेट मनुष्याच्या फुफ्फुसात, घशात जातात. त्यामुळे या परिसरात राहणार्‍या अनेक लोकांना आजार झाला आहे. यात विशेषतः लहान मुले, म्हातारे आणि गरोदर माता यांचा समावेश आहे. शिक्षक आमदार निवडणुकीच्या निमित्ताने सर्वच प्रमुख पक्षांच्या लोकांनी या रस्याची स्थिती व त्याचे दुष्परिणाम अनुभवले.