मेंढपाळ कुटुंबावर मधमाश्यांचा हल्ला

दहाजण जखमी तर एका बैलाचा मृत्यु

    31-Jan-2023
Total Views |
कारंजा लाड, 
honeybee bite  शेळ्या व मेंढ्या यांच्या चार्‍याच्या व पाण्याच्या शोधात फिरणार्‍या एका मेंढपाळ  (honeybee bite) कुटुंबावर मधमाश्यांनी हल्ला केल्याने एकाच कुटुंबातील दहाजण जखमी झाले. तर एका बैलाचा मृत्यू झाला. ही घटना ३० जानेवारी ला सायंकाळच्या दरम्यान कांरजातालुक्यातील वापटी कुपटी शेतशिवारात घडली.
 
 

होनीबी bite  
 
 
विशाल काळु कोळकर, प्रीयल संतोष कोळकर, शितल संतोष कोळकर, धनश्री (honeybee bite) गोपाल कोळकर, गोपाळ दशरथ कोळकर, गूंफाबाई मधुकर कोळकर, संगिता गोपाळ कोळकर, दिनेश विनोद कोळकर, कमला कोळकर व बापु चिमा कोळकर अशी जखमींची नावे असून ते सर्व कारंजा तालुयाती सोमठाणा येथील रहिवासी आहेत. प्राप्त माहितीनुसार जखमी मेंढपाळ मेंढ्या चारत असताना त्यांच्या शेजारच्या एका झाडावर मधमाश्यांचा घोळका बसला होता. एवढ्यात सोयाबीनच्या कुटाराने भरलेला उंच ट्रक त्या झाडाखालुन गेल्याने मधमाश्यांचा घोळका उठला व त्यांनी मेंढपाळांवर आणि बैलांवर हल्ला चढवला. त्यामूळे दहाजण जखमी झाले आणि एक बैल दगावला. जखमी अवस्थेत ते उपचारासाठी कारंजा उपजिल्हा रुग्णालयात आले असता त्यांचेवर वैद्यकीय अधिकारी डॉ. ऋचा गुघाने यांनी प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी अमरावती येथे जाण्याचा सल्ला दिला. त्यानुसार सद्या त्यांचेवर अमरावती येथील इर्विन हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.