सूर्यनमस्कार व क्रीडा स्पर्धा परीक्षा बक्षीस वितरण !

    31-Jan-2023
Total Views |
आलापल्ली, 
येथील क्रिडा संकुल (suryanamskar)  मैदानावर तालुका क्रीडा भारती अहेरी तालुक्याच्या वतीने आयोजितभव्य सूर्यनमस्कार व क्रीडा स्पर्धा परीक्षा बक्षीस वितरण सोहळा पार पाडण्यात आले कार्यक्रमात अध्यक्षस्थानातून मनोगतात अतिदुर्गम, अविकसित भागातील विध्यार्थ्यांनी आपल्या अंगी असलेल्या सुप्त गुणांच्या आधारे सूर्यनमस्कार योगाच्या माध्यमातून जिद्द व चिकाटीच्या जोरावर क्रीडा कौशल्य आत्मसात करून यश संपादन करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसच्या विभागीय महिला अध्यक्षा शाहीन हकीम यांनी व्यक्त केले आहे.
 
 
trtty
 
उदघाटक आलापल्लीचे सरपंच शंकर मेश्राम  (suryanamskar) तर प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा महासचिव कैलाश कोरेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे अहेरी विधानसभा प्रमुख लक्ष्मण येर्रावार,ग्रामपंचायत सदस्य सोमेश्‍वर रामटेके, पुष्पाताई अलोने,राष्ट्रवादी काँग्रेसचे अहेरी तालुकाध्यक्ष श्रीनिवास विरगोनवार, कार्याध्यक्ष पराग पांढरे आदी मान्यवर उपस्थित होते, विशेष म्हणजे क्रीडा स्पर्धा परीक्षा करिता माजी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा तथा गोंडवाना विद्यापीठाचे सिनेट सदस्या भाग्यश्रीताई आत्राम यांच्या कडून शालेय, महाविद्यालय,खुल्या गटाकरिता प्रथम, द्वितीय, तृतीय पुरस्कार प्रदान करण्यात आले,कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूजा आत्राम,प्रास्ताविक शेंडे सर आणि आभार प्रदर्शन काजल मडावी हिने केले,कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी क्रीडा भारती संस्थेच्या शालू केशनवार,प्रियंका देवकर, युक्ता मारबते, सोनी सिडाम,कन्या मिरालवार,संध्या येलपुलवार,रोशनी राऊत, अमोल आत्राम, आशीष बोरूले आदींनी परिश्रम घेतले,कार्यक्रमात विविध विद्यालयातील शिक्षकवृंद, विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.