चामेश्वरजी गहाने सिरेगावरत्न पुरस्काराने सन्मानित !

    31-Jan-2023
Total Views |
तभा वृत्तसेवा
अर्जुनी मोर,
महाराष्ट्रातील नक्षलग्रस्त  (terrorists in gondia) असलेल्या गोंदिया जिल्ह्यातील स्मार्टग्राम सिरेगावबांध ग्रामपंचायतीच्या वतीने गेल्या 5 वर्षांपासून सामाजिक बांधिलकी आणि सिरेगावबांध गावाचे नाव आपल्या कार्याने उंचावणार्‍या व्यक्तींचा प्रजासत्ताक दिनी या सिरेगावरत्न पुरस्काराने गौरविण्यात येते. या वर्षीच्या पुरस्काराचे मानकरी भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश चिटणीस चामेश्वर गहाणे ठरले आहेत. शाल, श्रीफळ, 5 हजार रोख व सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे.
 
 
rtrtrtr
 
चामेश्वर गहाणे यांनी गावाच्या सर्वांगीण विकासात (terrorists in gondia) आयुष्यभर मोठे योगदान दिले आहे. कोरोनासारख्या महामारीच्या काळात ग्रामस्थांना मोफत मास्कचा पुरवठा, नेत्र तपासणी, आरोग्य शिबिर, जलशुध्दीकरण प्रकल्प, स्वच्छता आभियान, रोजगार हमी, आर्थिक, धार्मिक मदत अशा आदी उपक्रमांना त्यांनी प्राधान्य दिलेले आहेत. त्यांनी आपल्या पुरस्काराचे श्रेय माजी सरपंचा स्व. तुळसा कापगते यांना मरणोत्तर त्यांच्या नातवाला दिले. यातूनच त्यांचे मोठेपण आपल्याला जाणवत असतो. या वर्षी सिरेगावबांध ग्रामपंचायत निवडणूकीत दोन पक्षांना एकत्र आणून सरपंच, उपसरपंच, सदस्य ग्रामसभेतून मतदान न घेता ग्रामविकास समिती स्थापन करण्यात अत्यंत महत्वाची भूमिका त्यांनी बजावली आहे. आपले मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले, हे गाव माझे आहे, मी या गावाचा आहे. गावाच्या विकासासाठी मी सदैव तत्पर आहे. या सत्कार सोहळ्याला सरपंचा सागरताई चिमनकर, उपसरपंच हेमकृष्ण संग्रामे, ग्रामसेवक एस. एल. रहांगडाले, तलाठी सी. डी. लेवाडे, तमुंस अध्यक्ष राजीराम कापगते, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष राजेश डोंगरवार, कृषी सहायक वाय. डी. भोयर, जिप शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, अंगणवाडी कर्मचारी, आशा वर्कर, तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.