गाव विकासासाठी महिलांनाही पुढाकार घेण्याची गरज !

    31-Jan-2023
Total Views |
तभा वृत्तसेवा
अर्जुनी मोर, 
आज प्रत्येक क्षेत्रात महिला  (women empowerment) आघाडीवर आहेत. संस्काराच्या जपणुकीसह महिलांनी हवे त्या क्षेत्रामध्ये प्रगती गाठण्यासाठी अंगी आत्मविश्वास महत्वाचा आहे. हाच आत्मविश्वास वाढविण्यासाठी आम्ही विविध उपक्रम राबवित आहोत. महिलांना एक विशिष्ट चौकटीत न राहता चौकटीत बाहेर येऊन काम करावे. महिलांच्या कार्यांना सशक्त करून महिलांनी सक्षम व्हावे व एकजुट येऊन गाव विकासासाठी महिलांनी पुढाकार घेण्याची गरज असल्याचे प्रतिपादन प्रा. मंजुताई चंद्रिकापुरे यांनी केले.
 
 

ererer 
 
 
 
मकरसंक्रांती सणाच्या निमित्त क्षेत्रातील महिलांशी (women empowerment)  भेटागाठी, त्यांच्याशी संवाद साधणे व समस्या जाणून घेण्यासाठी महागाव येथे महिला मेळावा आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी जिप सदस्या जयश्री देशमुख, भुमिता देशमुख, शालू देशमुख, गीता परशुरामकर, दिपा देशमुख, यामिना गहाणे, उर्मिला मेश्राम, विशाखा झोळे, देवेंद्रा मस्के, सत्यफुला नाकाडे, सविता गहाणे, सुमन देशमुख, शांता परशुरामकर, कुसुम झोळे, सुप्रिया बडवाईक यांच्यासह परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. दरम्यान, उपस्थित महिलांना हळदीकुंकू लावून त्यांना भेटवस्तू देण्यात आल्या. आयोजनासाठी स्थानिक महिलांनी परिश्रम घेतले.