ज्ञानवत्सल स्वामी यांचे प्रतिपादन, खासदार सांस्कृतिक महोत्सव - 2023 चे थाटात उद्घाटन
दिनांक :25-Nov-2023
Total Views |
नागपूर,
Cultural festival संस्कृती, परंपरा, ज्ञानाच्या आधारे भारत देश महासत्ता होईल, महागुरू बनेल, असे भाकीत जगभरातील विद्वान व तत्वज्ञानी वर्तवत आहेत. या खासदार सांस्कृतिक महोत्सवात संस्कृती, परंपरा व ज्ञानाच्या दर्शनाची प्रचिती घडते, असे प्रतिपादन स्वामीनारायण मंदिराचे प्रेरक वक्ते, समाजसुधारक ज्ञानवत्सल स्वामी यांनी येथे केले.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून आकाराला आलेल्या खासदार सांस्कृतिक महोत्सव - 2023 चे उद्घाटन आज ज्ञानवत्सल स्वामी यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. या महोत्सवाचे आयोजन हनुमाननगरातील क‘ीडा चौक येथील ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या पटांगणावर करण्यात आले आहे. Cultural festival याप्रसंगी व्यासपीठावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह सांस्कृतिक, वन मंत्री सुधीर मुनगंटीवार, खा. कृपाल तुमाने, माजी खा. अजय संचेती, आयओसीएल ह्युंदाई मोटर्सचे सीएमडी उनसू किम व पूनित आनंद, महिंद्राचे प्लांट हेड नितीन वैद्य, डॉ. विकास महात्मे, प्रेमप्रकाश स्वामी, आ. प्रवीण दटके, आ. कृष्णा खोपडे, नागो गाणार, बंटी कुकडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
आज पृथ्वीवर अनेक ठिकाणी मतभेद, मनभेदांमुळे हिंसा, युद्ध होताना दिसत आहेत. ज्या मूल्यांसह आपले ऋषी, महाऋषी जगले त्याच मूल्यांच्या आधारे जगात शांतता प्रस्थापित होऊ शकते, असे ज्ञानवत्सल स्वामी म्हणाले. या बारा दिवसांच्या सांस्कृतिक महोत्सवामुळे जीवनात सकारात्मक बदल व्हावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.आपली संस्कृती ही जीवनात पवित्रता निर्माण करणारी असून ती या महोत्सवातून आत्मसात करता आली तर आपल्याला भारतीय संस्कृतीची अनुभूती घेता येईल, असे स्वामी पुढे म्हणाले. देशाच्या हृदयस्थानी नागपूर शहर आहे तद्वतच जनतेच्या हृदयस्थानी नितीन गडकरी आहेत, या शब्दात सुधीर मुनगंटीवार यांनी नितीन गडकरी यांच्या कार्याचे कौतुक केले.
प्रारंभी नितीन गडकरी यांच्या हस्ते ज्ञानवत्सल स्वामी यांचा सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र गीताने महोत्सवाचा प्रारंभ झाला. त्यानंतर संस्कार भारतीतर्फे ‘महाराष्ट्र माझा’ हा 1100 हून अधिक कलाकारांचा सहभाग असलेला महाराष्ट्राची सांस्कृतिक व लोकधारा दर्शविणारा नाट्य, नृत्य व संगीतमय कार्यक‘म पार पडला. संकर्षण कर्हाडे व श्वेता पेंडसे यांनी सुरेख निवेदन केले. संकल्पना कांचन गडकरी व आशुतोष अडोणी यांची होती. Cultural festival संयोजन गजानन रानडे व अमर कुळकर्णी तर संगीत संयोजन आनंद मास्टे यांचे होते. सूत्रसंचालन बाळ कुळकर्णी यांनी केले. आभार जयप्रकाश गुप्ता यांनी मानले. रेणुका देशकर यांनी संस्कार भारतीच्या कार्यक‘माची माहिती दिली. महोत्सवाच्या यशस्वितेसाठी खासदार सांस्कृतिक महोत्सव आयोजन समितीचे अध्यक्ष प्रा. अनिल सोले, उपाध्यक्ष प्रा. मधूप पांडे, डॉ. गौरीशंकर पाराशर, अशोक मानकर कार्यरत आहेत.