इतस्ततः
- दत्तात्रय अंबुलकर
working hours-India यापूर्वी या साप्ताहिक सदरामध्ये ‘कामाचे वाढीव तास कितपत कामाचे?' या मथळ्यासह लेख प्रसिद्ध झाला होता. त्यावेळी त्या प्रासंगिक लेखामागची पृष्ठभूमी होती त्यावेळी नव्याने घोषित झालेल्या केंद्रीय पातळीवरील चार प्रमुख कामगारविषयक नियमांची. त्यामध्येच कामगारांचे कामांचे तास नव्या व प्रस्तावित तरतुदींनुसार वाढवून घेण्याची मुभा वा तरतूद व्यवस्थापनाला उपलब्ध करून देण्यात आली होती. working hours-India त्या नव्या तरतुदींनुसार कामगार-कर्मचाऱ्यांचे कामाचे तास दररोज १२ तासांपर्यंत वाढविण्याची तरतूद उपलब्ध झाली होती. त्यावर अर्थातच कायदेशीर चौकटीसह साधकबाधक चर्चा नव्या कामगार नियमांसह कामाच्या वाढीव तासांच्या मुद्यावर झाली. आपल्याकडे घटनात्मकदृष्ट्या कामगार हा विषय संयुक्त सूचीत असल्याने त्यावर केंद्र आणि राज्य या उभय सरकारांना अंमलबजावणीचा घटनात्मक अधिकार आहे. working hours-India अधिकांश राज्यांनी नव्या कामगार नियमांची प्रत्यक्ष अंमलबजावणी न केल्याने, नवीन नियमांसह कामाच्या वाढीव तासांचा मुद्दा जरा बाजूलाच पडलेला दिसतो.

working hours-India आता वाढत्या म्हणजेच १२ तास काम करण्याचा मुद्दा नुकताच व नव्याने सार्वत्रिक स्वरूपात चर्चेला आला आहे. यावेळची पृष्ठभूमी कायदेशीर वा प्रशासनिक स्वरूपाची नाही. इन्फोसिस या जगप्रसिद्ध संगणक कंपनीचे सहसंस्थापक नारायण मूर्ती यांच्या एका वक्तव्यामुळे हा विषय पुनश्च चर्चेत आला आहे. नारायण मूर्ती यांच्या मतानुसार, भारताची उत्पादकता ही जागतिक स्तरावर तुलना करता कमी आहे. working hours-India त्यामुळे गेल्या काही दशकांत जागतिक स्तरावर मोठी प्रगती केलेल्या अर्थव्यवस्थांशी भारताला स्पर्धा करायची असेल, तर तरुणांनी दिवसाला १२ तास काम करण्याची तयारी ठेवावी, असा आग्रही सल्ला नारायण मूर्ती देतात. तसे पाहता नारायण मूर्ती यांनी वरील मत इन्फोसिसचे माजी मुख्य वित्तीय अधिकारी मोहनराव पै यांच्याशी झालेल्या वार्तालापप्रसंगी व्यक्त केले. म्हणजेच एका प्रथितयश कंपनीतील दोन निवृत्त ज्येष्ठ व्यवस्थापन तज्ज्ञांमधील हा वार्तालाप म्हणता येईल. working hours-India मात्र, त्यातील विषय-आशयाला वृत्तपत्रांसह जी माध्यम प्रसिद्धी लाभली व समाजमाध्यमांसह नेटकऱ्यांनीदेखील हा मुद्दा आपापल्यापरीने तेवढाच नेटाने लावून धरला, त्यामुळे या विषयावर सांगोपांग विचार करणे क्रमप्राप्त ठरावे.प्रत्यक्षात व तपशिलासह विचार केल्यास, नारायण मूर्ती यांच्यानुसार गेल्या दोन-तीन दशकांत अनेक देशांनी मोठी प्रगती केली. त्यांच्याशी भारताला आता अपरिहार्यपणे स्पर्धा करावी लागेल. working hours-India त्यासाठी भारतीय तरुणांना दिवसाचे १२-१२ तास काम करावे लागेल.
विशेषतः चीनसारख्या देशाशी स्पर्धा करताना तरुणाईला जादा व जास्त तास काम करावे लागेल. जागतिक तुलनेत भारताची उत्पादकता अद्याप कमी असल्याने भारतीय तरुणांनी आठवड्याला ६० तास म्हणजेच दररोज सुमारे १२ तास काम करण्याचा निर्धार करावा, अशी विनंती मूर्ती यांनी भारतीय तरुणाईला आवर्जून केली आहे. working hours-India कायदेशीर : भारतातील कामगारविषयक कायद्यांमधील कारखानेविषयक कायदा, १९४८ चा प्रामुख्याने व अपरिहार्यपणे उल्लेख होतोच. स्वातंत्र्योत्तर काळातील या प्रमुख व महत्त्वाच्या कायद्याद्वारे, कारखान्यांतर्गत कामगारांची सुरक्षा व कल्याणाशिवाय औद्योगिक कामगारांसाठी कामाचे साप्ताहिक ४८ तास, अतिरिक्त कामाच्या तासांवर निर्बंध इत्यादी महत्त्वपूर्ण तरतुदी कायदेशीर बंधनकारक स्वरूपात घालण्यात आल्या. आता नव्या व प्रस्तावित चार प्रमुख कामगार कायद्यांमध्ये कामगारांच्या कामाच्या तासांमध्ये शिथिलता देण्याचा प्रयत्न असला, तरी या कामाच्या तासांवर त्यांच्या मोबदल्यासह निर्बंध राहणार आहेत, हे लक्षणीय ठरते. working hours-India व्यावहारिक व व्यावसायिक : कुठल्याही उद्योग-व्यवसाय कंपनीत कर्मचारी-कामगार व त्यांचे कामकाज हे महत्त्वाचे घटक असतात. उद्योग-व्यवसायाचे अर्थचक्र त्यांच्यावरच अवलंबून असते.
वैयक्तिक व आरोग्यविषयक : वर नमूद केल्याप्रमाणे कामगारांवर विशेष परिणाम करणाऱ्या कारखानेविषयक अधिनियम, १९४८ मध्ये कामगारांची आरोग्य तपासणी, आरोग्य, स्वच्छता यावर भर दिला जातो. working hours-India मुख्य म्हणजे, कामगार आणि त्यांचे साप्ताहिक कामाचे तास याची कायदेशीर नोंदणी व अंमलबजावणी करणे, व्यवस्थापन व व्यवस्थापनाचे प्रतिनिधी म्हणून व्यवस्थापकावर बंधनकारक करण्यात आले आहे. तसे न केल्यास, दंडासह कारवाईची तरतूद याच कारखाना अधिनियमामध्ये आहे. कोरोनानंतरची बदलती स्थिती व पृष्ठभूमी : कोरोनादरम्यानचा व त्यानंतरचा काळ हा जनसामान्यांच्या जीवनाप्रमाणेच औद्योगिक आणि कामगार क्षेत्रातसुद्धा दीर्घ स्वरूपाचे व मोठे बदल घडविणारा ठरला आहे. व्यावसायिक-औद्योगिक क्षेत्रातील ही मान्यता अद्याप कायम आहे. working hours-Indiaथोडी पडताळणी केली तर कोरोनाच्या कठीणच नव्हे, तर आव्हानात्मक कालावधीत कर्मचारी-अधिकारी-व्यवस्थापक-व्यवस्थापन या सर्वांनी सर्व विसरून व सर्वस्व पणाला लावून काम केले व कंपनीसाठीची आपली जबाबदारी पूर्ण करण्यासाठी प्रदीर्घ काळात दीर्घ कालावधीसाठी काम करण्याची आपली जबाबदारी पार पाडली. working hours-India त्यामुळे आव्हानपर परिस्थितीत आपले कर्मचारी, आपले विविध अधिकार विसरून जबाबदारी पार पाडतात, याचा पुरतेपणी पडताळा आला असताना, अशा कर्मचाऱ्यांमधील केवळ युवा कर्मचाऱ्यांना अधिक तास काम करण्याचे साकडे घालणे अप्रस्तुत वाटते.
प्रगत तंत्रज्ञान व मानवीय पैलू : आज तंत्रज्ञान-उत्पादन क्षेत्रात रोबोटपासून चॅट जीपीटी, कृत्रिम बुद्धिमत्तेसह कमी वेळात तातडीने व महत्त्वाचे काम करण्यावर भर दिला जाऊन, त्याचा अवलंब केला जातो. या बाबींची संबंधित क्षेत्रातील उपयुक्तता सिद्ध झाली आहेच. त्याशिवाय एक प्रगतशील आणि उत्पादक कार्यसंस्कृती त्यातून विकसित होऊ घातली आहे. working hours-India बदलता काळ, काळाची गरज व त्याचवेळी जागतिक स्तरावर भारतीयांची उत्पादकता व भारतातील उद्योग-व्यवसायांची वेगाने व मोठ्या प्रमाणावर प्रगती व्हावी म्हणून तरुणांचे वा इतर कुणाचे कामाचे तास वाढवून उत्पादकता वाढण्याचा अपेक्षावजा तोडगा कर्मचाऱ्यांच्या विद्यमान मानसिकतेच्या दृष्टीने पण पुरेसा वा पर्याप्त ठरू शकत नाही. त्यापेक्षा बदलती परिस्थिती व तंत्रज्ञानानुसार सर्वांनीच अधिक प्रभावी पद्धतीने व संगणकीय संवाद, प्रतिसाद पद्धतींसह काम करून सर्वस्तरांवरील उत्पादकता वाढविण्यावर तातडीने भर द्यावा, असा सल्ला जर नारायण मूर्ती यांनी दिला असता, तर ही बाब केवळ त्यांनाच नव्हे, तर इन्फोसिससारख्या प्रगत, प्रस्थापित व्यवस्थापनाला भूषणास्पद ठरली असती. working hours-India शिवाय त्यामुळे तरुणाईसह सर्वांच्याच उत्पादकतेला सकारात्मक चालना मिळाली असती; पण लक्षात कोण घेतो?
९८२२८४७८८६