एकता अधिवेशनात हिंदूंचे संघटन मजबूत करण्याचा निर्धार !

    01-Feb-2023
Total Views |
नागपूर, 
हिंदू जनजागृती समितीतर्फे हिंदूंचे संघटन hindu janjagruti samiti मजबूत करण्याच्या उद्देशाने रविवार, 29 जानेवारीला भागवत सभागृह, श्री गीता मंदिर, कॉटन मार्केट येथे हिंदू एकता अधिवेशन घेण्यात आले. विविध हिंदू संघटनांच्या प्रतिनिधींनी यात भाग घेतला.
 
 

erererer 
 
 
दीप प्रज्वलन तसेच प्रार्थनेनंतर कार्यक्रमाची hindu janjagruti samiti  सुरुवात झाली. मंचावर पू. गुरुवर्य पात्रीकर, पू. गिरीराज महाराज तसेच संघटनेचे महाराष्ट्र आणि छत्तीसगढचे समन्वयक सुनील घनवट उपस्थित होते. सुनील घनवट यांनी लव्ह जिहाद, हलाल जिहाद अशा विविध पैलूंवर प्रकाश टाकला. ते म्हणाले, जिहादचा एकमेव प्रयत्न जगभर इस्लामचे साम्राज्य निर्माण करणे हा आहे. हा प्रयत्न आपण हाणून पाडला पाहिजे. हलाल जिहाद भारतीय अर्थव्यवस्थेवर कशाप्रकारे आक्रमण करीत आहे याबाबतही त्यांनी भाष्य केले. या सगळ्यांमागे धर्मांतर हा एकच भाग असून धर्मांतर बंदीबाबत कठोर कायदे केले पाहिजेत, असे नमूद करून कोणकोणत्या राज्यात असे कायदे अस्तित्वात आले आहेत याची माहिती त्यांनी सांगितली. आपला देश हिंदू राष्ट्र घोषित होण्यासाठी सर्व हिंदूंनी जातीभेद, भाषा भेद विसरून एकत्र येण्याची गरजही त्यांनी प्रतिपादित केली. त्यानंतर गटनिहाय चर्चा झाली आणि प्रत्येक वस्तीमध्ये जनजागृतीचे कार्य करण्यासाठी काय प्रयत्न करावेत याचे मार्गदर्शन करण्यात आले. या अधिवेशनाचे सूत्रसंचालन वैशाली परांजपे यांनी केले तर आभारप्रदर्शन अतुल अरवेल यांनी केले.
 
(सौजन्य : संपर्क मित्र उमाकांत रानडे )