पदवीधरांसाठी NTPC अंतर्गत 300 पदांची भरती

    दिनांक :01-Jun-2023
Total Views |
नवी दिल्ली, 
NTPC Recruitment : नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (NTPC) ने विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरतीद्वारे असिस्टंट मॅनेजर (ऑपरेशन/मेंटेनन्स) ची एकूण 300 पदे भरायची आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करावे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 2 जून 2023 ठेवण्यात आली आहे.

NTPC Recruitment
 
या भरती प्रक्रियेसाठी (NTPC Recruitment) वयोमर्यादा ३५ वर्षे निर्धारित करण्यात आली आहे. अर्ज फी रु.300/- असणार आहे. या भरती प्रक्रियेचा भाग होण्यासाठी उमेदवाराकडे शैक्षणिक पात्रता असिस्टंट मॅनेजर (ऑपरेशन/मेंटेनन्स) उमेदवाराकडे BE/B.Tech पदवी (इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/इलेक्ट्रॉनिक्स/इंस्ट्रुमेंटेशन) असावी. अर्ज करण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ www.ntpc.co.in ला भेट देऊन सर्वप्रथम संपूर्ण सविस्तर माहिती करून घ्यावी.