नागपूर,
NMc recruitment अग्निशमन व वैद्यकीय विभागातील पदांच्या भरतीचा जुलै महिन्यात नारळ फुटत असतानाच राज्य शासनाने सुधारित आकृतिबंधानुसार महापालिकेकडे रिक्त असलेल्या आवश्यक पदांचा जॉब चार्ट मागविला आहे. त्याअनुषंगाने प्रशासन विभागाने महापालिकेच्या 43 विभागांकडून रिक्त पदे व त्या पदांची आवश्यकता या संदर्भात सविस्तर माहिती मागविली आहे.
महापालिकेमध्ये 13183 पर्यंतचा पहिला NMc recruitment आकृतिबंध मंजूर करण्यात आला होता. महापालिकेला ब वर्गाचा दर्जा मिळाल्याने नवीन आकृतिबंध सादर करण्याच्या सूचना राज्य शासनाने दिल्या होत्या. त्याअनुषंगाने 17981 पदांचा आकृतिबंध राज्य शासनाकडे सादर करण्यात आलेला आहे. 10 मे रोजी शासनाने या नव्या आकृतीबंधास मंजुरी दिलेली आहे. त्यामुळे महापालिकेत रिक्त पदांची सं‘या वाढली आहे. रिक्त पदांमुळे नियमित कर्मचार्यांवर दोन ते तीन टेबल सांभाळण्याची जबाबदारी आली आहे. दरम्यान, कोविड पृष्ठभूमीवर राज्य शासनाने अत्यावश्यक बाब म्हणून अग्निशमन व वैद्यकीय विभागातील जवळपास 852 पदे भरण्यासाठी परवानगी दिली आहे.
टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस NMc recruitment माध्यमातून सदरची पदे भरली जातील. जुलै महिन्यात रिक्त पदे भरली जाणार आहे. दरम्यान, एकीकडे ही भरती प्रकि‘या सुरू असताना दुसरीकडे मात्र राज्य सरकारने आस्थापना खर्चावरील बंदी उठवली आहे.त्यामुळे दुसर्या टप्प्यात 2000 पदांसाठी भरती प्रकि‘या राबविली जाणार आहे. त्यासाठी राज्य शासनाने महापालिकेकडून जॉब चार्ट मागितला असून, प्रशासनानेदेखील 43 विभागांकडून आवश्यक रिक्त पदांची यादी मागितली आहे.आस्थापना खर्चावरील नियम शिथिल करण्यात आल्याने राज्य शासनाने दिलेल्या सूचनेनुसार सुधारित आकृतिबंधातील रिक्त पदांचा जॉब चार्ट तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.