पाटणा,
Osama-RJD-Patna राजद म्हणजे राष्ट्रीय जनता दलाचे नेते आणि माजी खासदार मोहम्मद शहाबुद्दीन यांच्या मुलाने पक्षाची सदस्यता आहे. ओसामा शहाब असे त्याचे नाव असून त्याचाही गुन्हेगारीचा इतहिास आहे. राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी आज सकाळी बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडीदेवी यांच्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी पक्षप्रवेश केला. Osama-RJD-Patna मोहम्मद शहाबुद्दीन यांचे नाव राजकारणापेक्षा गुन्हेगारी क्षेत्रातील सहभागामुळे नेहमीच चर्चेत राहीले. त्यांच्यावर ३९ गंभीर गुन्हे दाखल होते. ८ प्रकरणं हत्येची, २० प्रकरणं हत्येचा प्रयत्न करण्याचे तर इतर प्रकरणांमध्ये अपहरण आणि खंडणी उकळण्याचा समावेश आहे. वर्ष २०२१ मध्ये कोविडच्या संसर्गाने त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, जमिनीच्या दोन प्रकरणांमध्ये तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या ओसामा शहाब याच वर्षाच्या सुरुवातीला तुरुंगातून सुटला आहे.
Osama-RJD-Patna तत्पूर्वी, ओसामाने आपले शिक्षण लंडनमधून पूर्ण केलेले असून, चांदपाली नावाच्या गावातील आयेशा नावाच्या डॉक्टर मुलीशी त्याने निकाह केला आहे. ओसामा शहाबच्या पक्षप्रवेशाने पक्षाची बांधणी मजबूत होण्याची अपेक्षा तेजस्वी यादव यांनी व्यक्त केली आहे. दिवंगत शहाबुद्दीन सिवानमधून खासदार होते आणि त्या भागात या कुटूंबांचा चांगलाच प्रभाव आहे. Osama-RJD-Patna राजदच्या कार्यकर्त्यांनी या निर्णयाचे स्वागत केले असून, ओसामा शहाबच्या पक्षप्रवेशाकडे एक राजकीय घडामोड म्हणून बघितले जात आहे. तसेच, या निर्णयामुळे अल्पसंख्य मतदारांना आकर्षित करण्यात मदत होणार आहे.
दरम्यान, भारतीय क्रिकेटपटू ईशान किशनचे वडील प्रणवकुमार पांडे यांनी जनता दल युनायटेडमध्ये प्रवेश केला. त्यांच्या पक्षप्रवेशामुळे बिहारच्या युवावर्गात एक सकारात्मक संदेश जाईल आणि एका नव्या क्षेत्रातून नागरिक पक्षासोबत जोडले जातील, अशी चर्चा राजकीय रंगली आहे.